• Sat. May 3rd, 2025

मंगेशकर महाविद्यालयाच्या ज्ञानेश्वर पाटील यांना आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक

Byjantaadmin

Oct 18, 2022

मंगेशकर महाविद्यालयाच्या ज्ञानेश्वर पाटील यांना आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक
औराद शहाजानी :- येथील मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालयातील बी.ए.प्रथम वर्षातील ज्ञानेश्वर कृष्णात पाटील या खेळाडूने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व राजर्षी शाहू महाविद्यालय (स्वायत्त) लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी शाहू महाविद्यालय (स्वायत्त) लातूर येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्रीको रोमन ५५ किलो वजन गटातील आंतरविभागीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक संपादन केले आहे. या यशाबद्दल शारदोपासक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बस्वराज वलांडे, उपाध्यक्ष प्रेमचंद बियाणी, सचिव रमेश बगदुरे, उपसचिव राजेश वलांडे, सर्व संचालक मंडळ, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.प्रदीप पाटील, सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या खेळाडूस महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक प्रा.विजयकुमार हंडे व प्रा.मुश्ताक रक्साळे यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *