निलंगा शहरातील हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना केलेली मारहाण: जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करावी मागणी
निलंगा(प्रतिनिधी):-निलंगा शहरातील श्वास हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना केलेली मारहाण लक्षात घेऊन,मारहाण करणाऱ्या लोकांवर कठोर कार्यवाही करावी व डॉक्टरांना संरक्षण द्यावे अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे
दि.१५-१०-२०२२ वार शनिवारी निलंगा शहरातील श्वास हॉस्पिटलमध्ये डॉ. मिथुन जाधव हे असताना अपघातात जखमी झालेल्या माझ्या भावावर लवकर उपचार का केले नाहीत असे म्हणत रवी मेंगले राहणार (बँक कॉलोनी निलंगा)व एक अनोळखी तरुण या दोघांनी डॉ. मिथुन जाधव यांना शिविगाळ करत मारहाण केली व टेबलवर असलेला लोखंडी पाणा फेकून मारला या घटनेत डॉ. जाधव हे जखमी झाले आहेत,किरकोळ कारणावरून संबंधित डॉ. मिथुन जाधव यांच्यावर झालेला हा प्राणघातक हल्ला खुप गंभिर असून निलंगा शहरातील डॉक्टरांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दिवसरात्र सेवा पुरविणारे डॉक्टर सुरक्षित नसतील तर वैद्यकीय सेवा कशी द्यावी हा प्रश्न आमच्या सर्व डॉक्टर मंडळींना पडला आहे हा प्रकार गंभीर असून जिल्हाधिकारी लातुर यांनी लक्ष घालून तात्काळ आम्हाला संरक्षण द्यावे व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर गुन्हे नोंद करण्यात यावे व असे प्रकार नंतर घडू नये यासाठी सर्व डॉक्टर मंडळींना आपण विश्वास द्यावा असे निवेदनात नमूद केले आहे
या निवेदनावर डॉ. शेषराव शिंदे(अध्यक्ष डॉक्टर असोसिएशन निलंगा) डॉ. रमेश भराटे(उपाध्यक्ष इंडियन मेडिकल असोसिएशन) डॉ. डी. एस. कदम(अध्यक्ष इंडियन मेडिकल असोसिएशन) डॉ. किरण बाहेती(सचिव) डॉ. उद्धव जाधव,डॉ. श्रीधर अहंकारी,डॉ. सुनील लंगोटे डॉ. सुधीर बिराजदार,डॉ.जगदाळे डॉ.सायगावकर,डॉ. नलमले,डॉ. सचिन बसुदे,डॉ. विक्रम कुडुंबले डॉ. अलमले,डॉ. सतिष जगताप
डॉ. मिथुन जाधव,डॉ. चिद्रेवार डॉ. साईनाथ कुडुंबले यांच्या साक्षऱ्या आहेत