लातूर शहरातील राजर्षी शाहु कॉलेज समोरील काकुशेट उक्का मार्ग हा एकेरी मार्ग म्हणून निश्चित
लातूर/ प्रतिनिधी: लातूर शहरातील चंद्रनगर येथील काकूशेठ उक्का मार्गावर शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे राजर्षी शाहू महाविद्यालय असून या मार्गावर विधार्थ्याची मोठया प्रमाणात वर्दळ / रहदारी असते. या मार्गावरच ब-याच बँका, खाजगी क्लिनिक, ऑप्टिकल, मेडीकल दुकाने, झेरॉक्सचे दुकाने इत्यादी असून तेथील रस्ता अरुंद असल्याने सतत मोठया प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होऊन वाहतुक व्यवस्था ठप्प होत आहे. याबाबत शहरातील वाहतुक व्यवस्थेबाबत दिनांक २७.०४.२०२३ रोजी बैठक घेण्यात आली. सदर बैठकीस परीवहन विभाग (RTO), पोलिस प्रशासनाचे प्रतिनिधी उपस्थित होते. सदर बैठकीमध्ये सर्वानुमते राजर्षी शाहू कॉलेज समोरील मार्ग हा एकेरी मार्ग व चारचाकी वाहनांसाठी नो पार्किंग झोन करणेस सहमती दर्शवली आहे.
करीता प्रायोगिक तत्वावर पुढील एक महिन्याकरीता राजर्षी शाहू महाविद्यालय समोरील काकुशेट उक्का मार्गाचा वाहतुकीसाठी वापर खालीलप्रमाणे निश्चीत करण्यात येत आहे.
१. बसस्थानकासमोरुन काकुशेट उक्का मार्ग ते गांधी चौकाकडे जाणेसाठी सकाळी ०९.०० ते रात्री ०९.०० वाजेपर्यंत एकेरी मार्ग म्हणून निश्चीत करण्यात येत आहे.
२. सदर मार्गावर चार चाकी वाहनांना सकाळी ०९.०० ते रात्री ०९.०० वाजेपर्यत नो पार्किंग झोन म्हणून निश्चित करण्यात येत आहे.
३. गुळ मार्केटकडून काकुशेट उक्का मार्गावरुन बसस्थानकाकडे मेन रोडला येण्यासाठी सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल त्यामुळे वाहनधारी सकाळी ०९.०० ते रात्री ०९.०० वाजेपर्यंत पर्यायी मार्ग म्हणून गुळ मार्केटकडुन BSNL ऑफिससमोरील रस्त्याने महात्मा गांधी चौकास वळसा घेवून बसस्थानक / हनुमान चौकाकडे जाणेसाठी या मार्गाचा वापर करावा.
तरी सर्व नागरीकानी पुढील आदेशापर्यंत बस स्थानकसमोरील काकुसेठ उक्का मार्ग एकेरी वाहतुकीसाठी घोषित केलेप्रमाणे वापर करून दुहेरी वाहतुकीसाठी तसेच चारचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी पर्यायी मार्गाचा वापर करून प्रशासनास सहकार्य करावे.