ष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष sharad pawar यांनी अध्यक्ष पदावरून पायउतार होणार, असे जाहीर केले आणि राज्यभरात पदाधिकाऱ्यांचे राजीनामे सत्र सुरू झाले आहे.पवारांच्या या निर्णयानंतर धाराशिव, बुलढाण्याच्या शहराध्यक्ष यांनी राजीनामा देणार असे जाहीर केले होते. पवारांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यभरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून विरोध सुरू आहे. आता पुणे शहरातसुद्धा राजीनामा सत्र सुरू झाले आहे. पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह सर्वच पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देत असल्याचे सांगितले आहे
शरद पवार यांच्या या निर्णयानंतर अनेक राजकीय क्रिया प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. नारायण राणे यांनी ट्वीट करत या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर त्यांनी त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. नारायण राणे म्हणाले, “माननीय शरद पवार साहेब, आपण राजकारणातही हवेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुध्दा हवेत.”
माननीय शरद पवार साहेब, आपण राजकारणातही हवेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुध्दा हवेत !@PawarSpeaks
— Narayan Rane (@MeNarayanRane) May 2, 2023
दरम्यान, शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज अचानक पक्षाच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय देशासाठी दुर्दैवी असून प्रत्येक कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागणारा आहे. त्यामुळे शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा, अशी भूमिका बहुतांश राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भूमिका घेतली. हा निर्णय मागे घेण्यात यावा, यासाठी शरद पवारांची विनवणी करण्यात येत आहे.
दरम्यान, “पक्षाच्या अध्यक्षपदावरून पायउतार झालो असलो तरी, सार्वजनिक कार्यातून कुठेही दूर जाणार नाही. सात दशकांहून अधिक काळ जनमानसांत काम करत आलोय आणि त्या सेवेत कोणताही खंड पडणार नाही. सार्वजनिक कार्यात मला अधिक वेळ देता येईल. मी कुठेही असेन, तिथे तुमच्यासाठी नेहमीप्रमाणे उपलब्ध असेन,” असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले होते.