कर्नाटक विधानसभा निवडणूक अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यासाठी सर्वच पक्षांकडून प्रचाराचा धडाका सुरू आहे. दरम्यान या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी भाजपाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. त्यापाठोपाठ आता काँग्रेसनेही आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. कर्नाटकरमध्ये सत्ता आल्यास बजरंग दल आणि पीएफआयसारख्या संघटनांवर बंदी घालू असं आश्वासन या जाहीरनाद्वारे देण्यात आलं आहे.
काँग्रेसच्या जाहीरनाम्यात नेमकं काय?
कर्नाटकमधील मतदारांना आकर्षित करण्यासाठी कॉंग्रेसकडून अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.CONGRESSने कर्नाटकमध्ये सरकार आल्यास बजरंग दल आणि पीएफआयवर बंदी घालण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच प्रत्येक कुटुंबाला २०० युनिट मोफत वीज देण्याचे आश्वासनही काँग्रेसकडून देण्यात आलं आहे. याबरोबरच कुटुंबातील प्रत्येक महिलेला दरमहा दोन हजार रुपये आणि महिलांसाठी राज्य सरकारी बसमध्ये मोफत प्रवासाची घोषणा या जाहीरनाम्यात करण्यात आली आहे. याशिवाय तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी बेरोजगार पदवीधरांना दरमहा तीन हजार रुपये देण्याची घोषणाही या जाहीरनाम्याद्वारे करण्यात आली आहे.
भाजपा, विहिंपचा काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर आक्षेप
Karnataka Polls: "Will ban…," Congress cites Bajrang Dal, PFI in manifesto
Read @ANI Story | https://t.co/dPNHfON1oR#KarnatakaElections2023 #KarnatakaElections #Congress #PFI #Manifesto pic.twitter.com/hV7tPVZsxW
— ANI Digital (@ani_digital) May 2, 2023
दरम्यान, काँग्रेसच्या या जाहीरनाम्यावर BJP आणि बजरंग दला आणि विश्वहिंदू परिषदेनं आक्षेप घेतला आहे. बजरंग दलाची तुलना पीएफआय सारख्या दहशतवादी संघटनेशी करणं हे दुर्दैवी आहे. आम्ही यासंदर्भात आम्ही काँग्रेसला कायदेशीर उत्तर देऊ, अशी प्रतिक्रिया विश्वहिंदू परिषदेचे नेते सुरेंद्र जैन यांनी दिली.