• Tue. Apr 29th, 2025

“शरद पवारांनी अचानक राजीनामा देणं खटकणारी बाब”, अशोक चव्हाणांचं मोठं विधान

Byjantaadmin

May 2, 2023

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्ष पदावरून निवृत्ती घेतली आहे. ‘लोक माझे सांगती’ या पुस्तकाच्या सुधारीत आवृत्ती प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवारांनी अचानक आपल्या निवृत्तीची घोषणा केली. शरद पवारांच्या या घोषणेनंतर कार्यकर्ते पदाधिकारी आणि नेते भावुक झाले आहेत. संबंधित निर्णय लगेच मागे घ्या, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.

Ashok chavan on sharad pawar retirement as ncp chief

शरद पवारांनी अध्यक्षपदावरून निवृत्ती घेतल्याची घोषणा केल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्यानं असं अचानक निवृत्ती घेणं खटकणारी बाब आहे, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते

यावेळी ASHOK CHAVHAN म्हणाले, “राष्ट्रवादीच्या भूमिकेवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. पण शरद पवारांसारख्या अनुभवी ज्येष्ठ नेत्याने अशाप्रकारे अचानक राजीनामा देणं, ही निश्चित खटकणारी बाब आहे. विशेषत: केंद्रीय पातळीवर सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन आगामी काळात भाजपाविरोधात आघाडी उभी करत असताना शरद पवारांची निवृत्ती घेणं, ही न पटणारी बाब आहे. त्यांनी असं करायला नको होतं, अशीच आमची भावना आहे. पण हा निर्णय त्यांचा अंतर्गत निर्णय असूनCONGRESS पक्ष त्यावर लक्ष ठेवून आहे.”

शरद पवारांनी अध्यक्ष पदावरून घेतलेल्या निवृत्तीचा महाविकास आघाडीवर काही परिणाम होईल का? असं विचारलं असता अशोक चव्हाण म्हणाले, “त्याचा परिणाम महाविकास आघाडीवर होईल,असं मला वाटत नाही. शेवटी नेतृत्व बदलत राहतं. पण एक अनुभवी नेता, या प्रक्रियेतून बाहेर पडला तर निश्चित नुकसान होईल. म्हणून त्यांचं अध्यक्ष पदावर राहणं, गरजेच आहे, असं मला वाटतं. पण शेवटी याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने निर्णय घ्यायचा आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed