• Tue. Apr 29th, 2025

राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुप्रिया सुळे होऊ शकतात; शरद पवारांचे निकटवर्तीय यांचे सूचक वक्तव्य

Byjantaadmin

May 2, 2023

ष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष SHARAD PAWAR यांनी आज मोठी घोषणा करत आपण लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन पदावरुन पायउतार होणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या निर्णयाला विरोध करत निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे. यावर शरद पवार यांचे निकटवर्तीय विठ्ठलशेठ मणियार यांनी मोठे भाष्य केले आहे.पवार यांच्या निर्णयावर मणियार यांनी ‘साम टिव्ही’शी संवाद साधला. त्यामध्ये ते म्हणाले, ”साहेबांना पुन्हा एकदा कॅन्सरचा त्रास झाला. त्यातून ते बरे झाले. तो प्रश्न नव्हता, मात्र, वाढते वय त्यानंतर बदलेली राजकीय परिस्थिती यामुळे त्यांना जो एक ताण योतोय, त्या ताणातून त्यांना आता थोडीशी विश्रांती मिळावी, यासाठी त्यांनी जी सामाजिक कामं उभी केली आहेत. त्याकडे त्यांनी लक्ष द्यावे. अनेक माणसं त्यांनी राजकारणात उभी केली आहेत.

राष्ट्रवादीची एक संपूर्ण टीम त्यांनी तयार केली आहे.  NCP अनेक नेते आहेत, अध्यक्षपदासाठीही माणूस तयार होईल. साहेबांनी चांगली टीम तयार केली आहे. आम्हाला मित्रांना सुद्दा वाटत होते, की त्यांनी आता थांबवले पाहिजे. त्यांनी निर्माण केलेल्या संस्थांमध्ये काम करता यावे, आणि त्यामध्ये त्यांना अधिक चांगले काम करता येईल.

पवार यांनी विचार करुन निर्णय घेतला आहे. हा निर्णय आमच्यासाठी धक्कादायक नाही, पण कार्यकर्त्यांसाठी धक्कादायक आहे. ते इतर कामांमध्ये स्वता: गुंतवून घेतील. नवीन माणूस तयार होण्यासाठी अधिक वेळ मिळेल. राजकारणामध्ये निवृत्तीची वेळ सांगितली जात नाही. त्यांनी निर्णय जाहिर केल्यानंतर चर्चा होणार आहे. मात्र, कधीतरी थांबावे लागणारच आहे, असेही मणियार म्हणाले.

अजित पवारांच्या चर्चांमुळे साहेबांनी निर्णय घेतला का? या प्रश्नावर मणियार म्हणाले, साहेबांनी अनेक धक्कादायक प्रसंग पाहिले आहेत. त्यांनी अनेक प्रसंगाना तोंड दिले आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात काय झाले. त्यामुळे ते कोणत्याही प्रसंगात खचत नाहीत, असेही मणियार म्हणाले. तुमच्या भेटीत काही बोलणे झाले होते का? असा प्रश्न विचारला असता मणियार म्हणाले, साहेब आमच्याशी राजकीय विषयावर खूप कमी बोलतात. मात्र, मी त्यांना अनेक वेळा म्हणालो की तुमच्याकडे मोठी टीम आहे, त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर जबाबदारी सोपवली पाहिजे, असे म्हटले होते.

आर. आर. पाटील असते तर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते, असेही मणियार यांनी सांगितले. एक मला वाटत होते, की आता साहेब टाईमिंग साधतील, असे वाटत होते. शरद पवारांचा वारसदार कोण? या प्रश्नावर मणियार म्हणाले, त्या दृष्टिने काही विचार केलेला नाही. अनेक लोक आहेत. त्यामधून एकाची निवड होईल. साहेब निर्णय घेताना सगळ्यांना विश्वासात घेतील. या प्रश्नाचे उत्तर तसे देता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. साहेबांच्या मनामध्ये एखादे नाव असले तरी सुद्धा ते सर्वांशी चर्चा करतील.

त्यांच्यासारखा माणूस तुम्हाला दिसतो का? त्यावर मणियार म्हणाले, साहेबांशी कुणाचीच तुलना होऊ शकत नाही. राष्ट्रवादीच्या वकुबाप्रमाणे काम करणारा कार्यकर्ता असावा. कोण असेल के सांगणे कठीण आहे. तुमचा उद्देश सुप्रिया सुळे यांच्याकडे असेल तर त्या तशा पद्धतीने तयार होताहेत. त्या १५ वर्ष खासदार आहेत. त्यांना महाराष्ट्राचा अभ्यास आहे, त्यामुळे त्या त्या पद्धतीने काम करत आहेत. सामाजिक कामात आणि राजकीय कामात लक्ष घालतात. त्या होऊ शकतात पण होतीलच असे मला सांगता येणार नाही, असे सूचक वक्तव्य मणियार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed