राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष SHARAD PAWAR यांनी मोठी घोषणा केली आहे. आपण लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच राज्यसभेची ही टर्म संपली की आपण या पुढे निवडणूक लढणार नाही.अशीही घोषणा त्यांनी केली आहे.
या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी त्यांना निर्णय मागे घेण्याची विनंती केली. यावेळी नेत्यांसह कार्यकर्त्यांना अश्रू अनावर आले. दरम्यान, विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सर्वांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तसेच आज ना उद्या ही वेळ येणार होती, असेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.
NCP पवारसाहेबांशिवाय पुढे जाणार नाही, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, “आपल्या सर्वांच्या भावना साहेबांनी समजून घेतल्या. तुम्ही गैरसमज करून घेतला आहे. पवारसाहेब अध्यक्ष नाहीत म्हणजे पक्षामध्ये नाहीत असे होणार नाही. काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे आहेत, पण सोनिया गांधीकडे पाहून पक्षाचे काम सुरू आहे. यापुढेही शरद पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखालीच पक्षाचे काम सुरू राहणार आहे.”
यावेळी AJIT PAWAR यांनी शरद पवार यांच्या विचारानुसारच पक्षाचे काम होईल, असेही अश्वासन दिले. अजित पवार म्हणाले, “पवार साहेबांच्या वयाचा विचार करता, साहेबांशी आणि सर्वांशी चर्चा करून आपण नवीन नेतृत्वाकडे आपण ही जाबाबदारी देणार आहे. ते नेतृत्व साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करेल. शेवटी साहेब म्हणजे पक्ष हे सांगण्याची कुणाची गरज नाही. यानंतरही कुठेही आला तरी साहेब आपल्याला मदत करतील. साहेब अध्यक्ष असू वा नसू आतापर्यंत जसे सुरू होते तसेच यापुढेही काम सुरू राहील.”
शरद पवार आपल्या निर्णयावर ठाम असल्याचेही यावेळी आजित पवारांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, “पवारसाहेबांनी भाकरी फिरवायची असते, असे वक्तव्य केले होते. आता तुम्ही म्हणता त्यांच्यापासून सुरुवात नको. पण त्यांनी आता निर्णय घेतला आहे. मी काकींशीही (शरद पवारांच्या पत्नी) बाललो आहे. त्यावेळी त्यांनी सांगितले की साहेब निर्णय मागे घेणार नाहीत. ते यावर ठाम आहेत. वयानुसार आज ना उद्या हा निर्णय घेण्याची वेळ येणारच होती. ते अध्यक्ष नसले तरी आपल्याला त्यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही.”