• Tue. Apr 29th, 2025

शरद पवारांच्या निर्णयानंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले…

Byjantaadmin

May 2, 2023

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मोठी घोषणा केली आहे. आपण लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच राज्यसभेची ही टर्म संपली की आपण या पुढे निवडणूक लढणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Devendra Fadnavis, Sharad Pawar

या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी त्यांना निर्णय मागे घेण्याची विनंती केली. यावेळी नेत्यांसह कार्यकर्त्यांना अश्रू अनावर आले. दरम्यान, शरद पवारांच्या निर्णयावर भाजप नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार यांनी घेतलेल्या निर्णयामुळे महाविकास आघाडीतील काँग्रेस नेते ASHOK CHAVAN यांनी भावना व्यक्त केली. ते म्हणाले “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिकेवर लक्ष आहे. पवार यांनी घेतलेला निर्णय हा त्यांच्या पक्षातील अंतर्गत विषय आहे. मात्र पवारसांहेबांसरखा अनुभवी, ज्येष्ठ नेत्याने अशा पद्धतीने अचानक राजीनामा देणे ही खटकणारी बाब आहे. तर राष्ट्रवादी पक्षाच्या समतीने त्यांचे मनपरिवर्तन करावे

दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस NAGPUR  दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी शरद पवारांचा निर्णय हा वयक्तिक असल्याचे सांगितले. फडणवीस म्हणाले, “निवृत्ती घेण्याचा शरद पवारांचा निर्णय वैयक्तिक आहे. ही बाब राष्ट्रवादी पक्षातील अंतर्गत आहे. त्यामुळे आताच त्यांच्या निर्णयावर आणखी काही बोलणे उचित राहणार नाही. आता वाट पाहणेच योग्य आहे. यापुढे त्यांच्या भूमिकेवर लक्ष देऊन आहेत. त्यांनी हा निर्णय का घेतला? त्याची पार्श्वभूमी काय? हे समजून घेतल्यावरच बोलणे योग्य राहील.”

यावेळी फडणवीस यांनी पुस्तक लिहणार असल्याचेही जाहीर केले. तसेच पहाटेच्या शपथविधीवरून सूचक वक्तव्यही  FADNVIS  यांनी केले. फडणवीस म्हणाले,” शरद पवारांचे पुस्तक वाचले नाही. त्यावर काही बोलणार नाही. आता मीही एक पुस्तक लिहिणार आहे. ते योग्य आली की लिहील. त्यावेळी शरद पवारांनी त्यांच्या पुस्तकात नेमकं काय म्हटले, मला काय म्हणायचे आहे आणि सत्य काय आहे, अशा ज्या अनेक गोष्टी आहेत त्या माझ्या पुस्तकातून निश्चित समजतील.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed