राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष SHARAD PAWAR यांनी मोठी घोषणा केली आहे. आपण लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन पायउतार होणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच राज्यसभेची ही टर्म संपली की आपण या पुढे निवडणूक लढणार नाही. अशीही घोषणा त्यांनी केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. त्यांच्या कार्यकर्त्यांनी, चाहत्यांनी त्यांच्या राजीनाम्याला प्रचंड विरोध केला. गेल्या दोन तासांपासून कार्यकर्ते, नेते त्यांना निर्णय मागे घेण्याची विनंती करत होते. कार्यकर्ते नेत्यांनी विनंती केल्यानंतर राष्ट्रवादीचा परिवार, ज्येष्ठ नेते मिळून आम्ही निर्णय घेऊ, असे सांगितलं
दरम्यान, यावेळी राष्ट्रवादीचे नेते, नवाब मलिक यांच्या मुलींनीही यावेळी शरद पवार यांना भावनिक साद घातली. आमचे वडील तुरुंगात असताना तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहिलात. वडिलांप्रमाणे आम्हाला साथ दिली. पण आम्हाला तुमचा हा निर्णय मान्य नाही. तुमचा हा निर्णय़ योग्य नाही. आम्हाला मान्य नाही. निर्णय मागे घ्या, अशी भावनिक साद घालत मलिक यांच्या मुलींनी शरद पवार यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली.
काय म्हणाले शरद पवार ?
मला विद्यार्थी चळवळीत आधिक रस होता. नववीत असताना पहिला मोर्चा काढला. १९६७ पर्यंत मला आमदार म्हणून संधी मिळाली. त्यानंतर सतत मी विविध पदांवर आहे. म्हणजेच गेली ५६ वर्षे मी राजकारणात विविध पदावर आहे. आता आपण राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदारुन पायउतार होणा असल्याचे पवार यांनी सांगितले
पण कुठे थांबावं हे मला कळतं. मी निवृत्त झाल्यानंतर राष्ट्रवादीची एक समिती नेमावी. प्रपुल्ल पटेल, सुनील तटकरे ., छगन भुजबळ, दिलीप वळसेपाटली, धनंजय मुंडे, राजेश टोपे, . असतील, पक्षात कोणाला कोणतं काम करावं, कोणाला कोणतं पद द्यावं हे ठरवतील. असंही त्यांनी यावेळी म्हटलं. तसेच मी त्यानंतरही जनतेच्या सेवेत कायम राहिल. असही त्यांनी यावेळी नमुद केलं. यावेळी बोलताना शरद पवार यांनी ही घोषणा केली. त्यांच्या या निर्णयामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. त्यांच्या कार्यकर्त्यांनी, चाहत्यांनी त्यांच्या राजीनाम्याला प्रचंड विरोध केला.