• Mon. Apr 28th, 2025

‘या’ दोन राज्यातील सत्ता पाडण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु; कपिल सिब्बलांचा मोठा दावा

Byjantaadmin

May 1, 2023

‘भाजप खूप चांगले काम करत आहे.आज भाजप मीडियाला शांत करत आहे. मेन स्ट्रीम मीडिया  BJP अजेंडा चालवत आहे. हे खूप चांगले काम आहे. जिथे जिथे विरोधी पक्षाचा नेता आहे. तिथे ईडी, सीबीआय ला पाठवले जाते. त्यांना वाटलं की एखाद्या नेत्याला ईडी, सीबीआयच्या जाळ्यात अडकवायचे, तर त्याला सीबीआय नोटीस पाठवते. अशा शब्दांत राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.

Kapil Sibal On BJP

देशभरात घडत असलेल्या अशा अनेक प्रकरणांवर राज्यसभा खासदार  KAPIL SIBBAL यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखत दिली आहे. याचवेळी सिब्बल यांनी भाजपवर हुकूमशाहीचा आरोपही केला आहे.

देशातील अनेक राज्यांमध्ये विरोधी नेत्यांना वेगवेगळ्या प्रकरणात सीबीआय आणि ईडीच्या नोटिसा पाठवल्या जात आहेत. त्यांच्यावर दबाव आणला जात आहे. गेल्या महिन्यात उत्तर प्रदेशातील माफिया अतिक अहमद आणि अशरफ अहमद यांची यूपीमध्ये पोलीस कोठडीत असतानाच खुन करण्यात आला, या प्रकरणावरुन विरोधक भाजपवर प्रश्न उपस्थित करत आहेत. यापूर्वी अतिक अहमद यांचा मुलगा असद अहमद याच्या एन्काऊंटरवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

झारखंडमध्ये सरकार पाडण्याचा भाजपचा प्रयत्न

“भाजप झारखंड आणि छत्तीसगडमध्ये ते सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. ते जिथे जिथए सरकारे पाडत आहेत,ते खूप चांगले काम आहे. त्यासाठी अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. सोशल मीडियावर कोणता कंटेंट दाखवला जाईल? हे खूप चांगले काम आहे. एन्काउंटर हे खूप चांगले काम आहे.” अशी उपरोधित टीकाही त्यांनी केली आहे

याच वेळी सिब्बल यांनी अतीक अहमदच्या खुनावरही भाष्य केलं आहे.”जेव्हा कोणताही आरोपी पोलिसांच्या कोठडीत असतो.याचा अर्थ आरोपीचे संरक्षण करणे हे पोलिसांचे काम असते. सुरक्षा नेलेल्या आरोपींना पुरवावे लागेल.रात्री साडेदहा वाजता अशी कोणती मेडिकल इमर्जन्सी होती की त्यांना इतक्या तातडीने रुग्णालयात न्यावे लागले, त्यावेळी डॉक्टर तुरुंगात का गेले नाहीत हे कोणी का विचारत नाही?दोन्ही भावांना कसे? इतकीच घाई होती म्हणून पोलिस त्यांना रुग्णालयात घेऊनही गेले मग ते इतरांना कसे कळले?हे प्रकरण इतके संवेदनशील असताना.आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगत आरोपी सुप्रीम कोर्टात गेला होता.पोलिसांनाही कळले.मग त्यांना रात्रीच्या अंधारातच रुग्णालयात का नेण्यात आल, असे अनेक सवाल त्यांनी उपस्थित केल आहेत.

“अशा परिस्थितीत असे आरोपी हॉस्पिटलमध्ये कसे पोहोचले, हे कुणालाही कळत नाही? मग त्यांना रुग्णालयाच्या मुख्य दरवाजापासून दूर असलेल्या गेटवरच का उतरवण्यात आले, तिथे मीडियाचे कर्मचारी कसे पोहचले? आतिक अशऱफला मारल्यानंतर हत्यारे जय श्रीराम बोलतच राहिले.कोणताही गुंड असो,काहीही असो.कसाबसारखा.कसाब दहशतवादी होता.आमच्या अनेक निरपराध लोकांचा बळी गेला.त्याच्यावरही प्रयत्न झाले.त्यालाही गोळ्या घातल्या जाऊ शकल्या असत्या, त्याच्याकडे वकील नव्हता. सरकारने त्याला वकील दिला. पण त्यांच्या मृत्यून लोकांना आनंद होत आहे. लोक आनंद साजरा करत आहेत. असं तुम्ही कसं म्हणू शकता, लोकशाहीत असे होत नाही.” असंही सिब्बल यांनी यावेळी नमुद केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed