निलंगा व औराद शाहजानी कृषी उत्पन्न बाजार समितीवर ( Nilanga APMC Result News) आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या भाजप- सेना युतीच्या अरविंद पाटील निलंगेकर परीवर्तन पॅनलने एकहाती विजय मिळवत विरोधकांना चारीमुंड्या चित केले. आमदार अभिमन्यू पवार व काका अशोक पाटील निलंगेकर यांच्या दोन्ही पॅनलचा धुराळा त्यांनी उडवला.
औरद शहाजनी आणि निलंगा कृषी उत्पन्न बाजार समितीवर एक हाती सत्ता मिळवत संभाजी व अरविंद निलंगेकर यांनी परफेक्ट नियोजन करत विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम केल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे. निलंगा कृषी उत्पन्न बाजार समितीत SAMBHAJI PATIL NILAGEKAR यांच्या पॅनलने १८ पैकी १८ जागा जिंकत ABHIMANYU PAWAR आणि महाविकास आघाडीच्या पॅनलला धोबीपछाड दिला.
तर औराद कृषी उत्पन्न बाजार समितीत १८ पैकी १८ जागी विजय मिळवत भाजपाने महाविकास आघाडी व अभिमन्यू पवार यांच्या दोन्ही पॅनलला भोपळाही फोडू दिला नाही.मागील काही दिवस आरोप प्रत्यारोप सुरू होते. परंतु निवडणुकीचा निकाल लागला आणि वाद संपला. माझे आजोबा शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा वारसा घेऊन आम्ही पुढे जात आहोत, अशी प्रतिक्रिया अरविंद पाटील निलंगेकर यांनी विजयावर बोलतांना व्यक्त के
निलंगा बाजार समिती निवडणूकीत सहकारी मतदार संघातून शिवकुमार चिंचनसुरे, गुंडेराव जाधव, श्रीरंग हाडोळे,अरविंद पाटील जाजनूरकर, लालासाहेब देशमुख, दयानंद मुळे, रामकिशन सावंत, भागीरथी जाधव, कस्तूरबाई जाधव, मन्मथ स्वामी, काशीनाथ जाधव, किशराव म्हेञे, तर ग्राम पंचायत मतदार संघातून रोहित पाटील, तुकाराम सोमवंशी, अनिल कांबले,हणमंत पाटील, व्यापारी मतदार संघातून संतोष बरमदे, योगेश चिंचनसुरे विजयी झाले. तर हामाल तोलारी मतदार संघातून सतिश कांबळे यांना व आ. अभिमन्यू पवार भाजपचे उमेदवाराला समान मते पडली होती. टाँस करून कांबळे विजयी झाले आहेत.
औराद शाहजानी कृषी उत्पन्न बाजार समितीवरही भाजपाने एकहाती सत्ता मिळवत सर्व १८ जागेवर विजय मिळवला आहे. सहकार मतदार संघातून नरसिंग बिराजदार, शाहूराज थेटे, वाघजी पाटील, तुकाराम पाटील, अनंत बोंडगे, धनराज माने, नागनाथ स्वामी, रंजना शिंदे,अर्चना गोवंडगावे, कालिदार रेड्डी, सुरेश बिराजदार हे विजयी झाले. तर ग्रामपंचायत मतदार संघातून शाहूराज पाटील, बंकट बिरादार, राम काळगे, संजय दोरवे, हमाल तोलारी मतदार संघातून राहूल सुर्यवंशी व व्यापारी मतदार संघातून निर्भय पिचारे, सतीश देवणे यांनी विजय मिळवला.
महाविकास आघाडी चे प्रमुख पराभूत निलंगा बाजार समिती