• Mon. Apr 28th, 2025

आजपासून बदलले हे चार नियम!

Byjantaadmin

May 1, 2023

मे महिना सुरू झाला आहे. आज कामगार दिन आणि सिंधुदुर्गाचा स्थापना दिवसही आहे. १ मेच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी झाल्या आहेत. याशिवाय पंजाब नॅशनल बँकेने एटीएमचे नियम बदललेत. मे महिन्याच्या पहिल्या दिवशी एकूण ४ नियमांत बदल करण्यात आले आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया आज कोणते नियम बदलले आहेत.

PNB ATM to GST rule Changes from 1 May 2023

व्यावसायिक एलपीजी सिलिंडर

व्यावसायिक LPG गॅस सिलिंडर आजपासून १७१.५० रुपयांनी स्वस्त झाला आहे. केंद्र सरकार दर महिन्याच्या पहिल्या तारखेला आढावा घेतल्यानंतर एलपीजी, सीएनजी आणि पीएनजीचे दर बदलत असते. यापूर्वी एप्रिलमध्ये व्यावसायिक सिलिंडरची किंमत ९१.५० रुपयांनी कमी झाली होती. नव्या कपातीनंतर दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरची किंमत १८५६.५० रुपयांवर गेली आहे.

म्युच्युअल फंडांमध्ये आता केवायसी अनिवार्य

बाजार नियामक सेबीने म्युच्युअल फंड कंपन्यांना केवायसी केलेल्या वॉटेलमधूनच पैसे घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे म्युच्युअल फंड कंपन्यांना केवळ केवायसी केलेल्या ई-वॉलेटमधून पैसे घेता येणार आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की, जर तुमच्या वॉलेटचे KYC झालेले नसेल तर तुम्ही त्याद्वारे गुंतवणूक करू शकणार नाही. लक्षात ठेवा हा नियम १ मेपासून लागू झाला आहे.

जीएसटीचे नियम बदलतील

जीएसटीशी संबंधित एक प्रमुख नियम बदलला आहे. नवीन नियमानुसार, १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या कंपन्यांना त्यांच्या व्यवहारांची बिलं ७ दिवसांच्या आत इनव्हॉइस नोंदणी पोर्टलवर (IRP) अपलोड करावी लागणार आहेत. सध्या हे करण्यासाठी कोणतीही कालमर्यादा निश्चित केलेली नाही.

पंजाब नॅशनल बँक एटीएम शुल्क आकारणार

सरकारी बँक पंजाब नॅशनल बँकेने (PNB) एटीएममधून व्यवहार करण्याच्या नियमात बदल केला आहे. खात्यात अपुऱ्या निधीमुळे तुमच्या एटीएममधील व्यवहार अयशस्वी झाल्यास PNB तुमच्याकडून १० रुपये आकारेल. एवढेच नाही तर या १० रुपयांवर स्वतंत्रपणे जीएसटी आकारला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed