शिवसेनेचे हिंदुत्व वैदिक नाही, चातुर्वर्ण्य मानणारे नाही, त्यामुळे ते आम्हाला मान्य आहे, असे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.
अंधेरी विधानसभेच्या पोटनिवडणुकीत मांगितला तर आम्ही उद्धव ठाकरेंना पाठिंबा देऊ, असे मतही प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.
कमळाला पाठिंबा नाहीच
अंधेरी पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून लटकेंच्या पत्नीना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, संभाजी ब्रिगेड असे सर्व एकत्रित निवडणूक लढवत आहे. तर दुसरीकडे शिंदेंनी ही जागा भाजपच्या उमेदवारासाठी सोडली असून येथून भाजपचे उमेदवार मुरजी पटेल हे निवडणूक लढवत असून कमळाला मी कसाच पाठिंबा देणार नाही असे वक्तव्य वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
काँग्रेस आणि शिवसेनेकडून अजूनही कुठला प्रतिसाद आला नाही, तो आला तर आम्ही शिवसेना आणि काँग्रेससोबत युतीचा निर्णय घेऊ, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
ठाकरे, शिंदे भाजपला नकोच
भाजपला ज्या प्रकारे उद्धव ठाकरे नको होते त्याच प्रकारे एकनाथ शिंदेंही नको आहेत. सध्या जे राज्यात चालले आहे ते राजकारणाच्या दृष्टीने योग्य नाही. ही काही गादीची लढाई नाही. अनुकूल वेळ असेल तरच भाजप एकनाथ शिंदेंना सोबत घेतील असे वक्तव्य त्यांनी यवतमाळमध्ये केले होते.