• Sat. May 3rd, 2025

जिल्हाधिकाऱ्यांनी ऐकल्या लातूर महानगराच्या व्यथा.. रविवारच्या सकाळी पोहचले “सी ” झोन मध्ये

Byjantaadmin

Oct 16, 2022

जिल्हाधिकाऱ्यांनी ऐकल्या लातूर महानगराच्या व्यथा.. रविवारच्या सकाळी पोहचले “सी ” झोन मध्ये

लातूर दि.16 (जिमाका) :-

जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. रविवारी सकाळी लातूर महानगरपालिकेच्या “सी” झोन मध्ये .. नियोजित जन सुनावणी होती…. तिथे ऐकल्या लातूर महानगराच्या व्यथा.. नाल्या, रस्ते, नागरिकांसाठी शौचालय देणे, वाढीव पाणी कर, विद्युत सुविधा, हे सगळे ऐकून घेऊन… या नागरिकांच्या समस्या सोडविण्याच्या सुचना महानगरपालिका प्रशासनाला दिल्या.
जिल्हाधिकारी यांच्याकडे लातूर महानगरपालिकेच्या आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार आहे.
नागरिकांच्या प्रभागातील समस्या तक्रारी जाणून घेण्यासाठी व निवारणासाठी जनसुनावणी लातूर शहर महानगरपालिका क्षेत्रीय कार्यालय सी. झोन येथे भरविण्यात आली होती. यावेळी मनपा उपायुक्त मयुरा शिंदेकर, शहर अभियंता नवनाथ केंद्रे , क्षेत्रिय अधिकारी समाधान सुर्यवंशी , स्वच्छता विभाग प्रमुख रमाकांत पिडगे, शाखा अभियंता पी. सी. घंटे, विद्यत विभाग प्रमुख श्री. ताकपिरे, महिला बाल विकास अधिकारी रुक्मानंद वडगावे, संबंधित विभागाचे अधिकारी आदि त्या त्या भागातील नागरिक, प्रतिनिधी, महिला उपस्थिती होते.
यात प्रभाग क्र. 3,4,5,6 मधील नागरिकांनी त्यांच्या समस्या जसे की, रस्ते, नाली, जुन्या पाण्याच्या बोअरवरील टाक्या काढण्यासाठी, कबाले वाटप तक्रारी कचरा व्यवस्थापन, ओला आणि सुका कचरा यासंबंधी या जनसुनावणीत विविध एकूण 16 निवेदने प्राप्त झाली. क्षेत्रिय कार्यालयातंर्गत असलेल्या कंपोस्ट पिट व एम. आर.एफ. सेंटरबाबतच्या तक्रारी आदि नागरिकांच्या तक्रारीवर कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा लातूर महानगर पालिकेचे आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिले.
तसेच कचरा वेगळा करण्याची ही जबाबदारी नागरिकांची आहे. कचरा घरात साठवताना तो ओला आणि सुका कचरा वेगळा करावा. ज्या ठिकाणी डासांचे प्रमाण वाढत आहे त्या ठिकाणी फवारणी महानगरपालिकेने करण्याबाबतही सांगितले. नागरिकांच्या समस्या लक्षात घेवून त्यावर निर्णय घेण्यात यावा. स्ट्रीट लाईटचे काम टप्याटप्याने करण्यात येईल जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न राहील, असे त्यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *