महाराष्ट्र महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथप्रदर्शन
निलंगा: भारताचे माजी दिवंगत राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी. जे. अब्दूल कलाम यांच्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने प्राचार्य डॉ. माधव कोलपूके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या अभिवादन कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विठ्ठल सांडूर यांनी केले. अभिवादन कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथप्रदर्शन व ग्रंथवाचन हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य माधव कोलपूके यांनी केले. याप्रसंगी ग्रंथपाल मिनाक्षी बोंडगे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. विठ्ठल सांडूर, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.. ज्ञानेश्वर चौधरी, हिंदी विभागप्रमुख डॉ. बालाजी गायकवाड, राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. शिवरुद्र बदनाळे इत्यादिंची उपस्थिती होती. ग्रंथप्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथपाल मीनाक्षी बोंडगे, ग्रंथालयीन कर्मचारी माधव शिंदे, अंजू रंगदळ, मनियार यांनी परिश्रम घेतले.