• Tue. Apr 29th, 2025

उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर निवडणूकीत कृषी विकास पॅनलच्या नंदीचा वारू चौफेर उधळला

Byjantaadmin

Apr 29, 2023

उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर निवडणूकीत कृषी विकास पॅनलच्या नंदीचा वारू चौफेर उधळला

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी मानले मतदारांचे आभार विजयी उमेदवारांचे अभिनंदन करून दिल्या शुभेच्छा

 

लातूर प्रतिनिधी : लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत कृषि विकास पॅनलचे सर्वच्या सर्व १८ उमेदवार मोठया मताधिक्कयांने विजयी झाले आहेत. या
निवडणूकीत कृषि विकास पॅनलच्या सकारात्मक प्रचाराने शेतकरी विकास पॅनलच्या वतीने राबवण्यात आलेले अफवा तंत्र आणि नकारात्मक प्रचाराला
धोबीपछाड केले आहे. लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीतील कृषि विकास पॅनलचे Nसोसायटी सर्वसाधारण मतदार संघात जगदीश जगजीवनराव बावणे (६०२), श्रीनिवास श्रीराम शेळके (५७४), लक्ष्मण रामकृष्ण पाटील (६०५), युवराज मोहनराव जाधव (५९७), आनंद रामराव पाटील(६०९), आनंद धोंडीराम पवार (६००),तुकारामग्यानदेव गोडसे (६०८), महिला मतदार संघात सुरेखा बळवंत पाटील (६२३), लतिका सुभाष देशमुख (६२६), इमाव मतदार संघात सुनिल नामदेवराव पडीले(६१०), विमुक्त जाती भटक्या जमाती मतदार संघात सुभाष दशरथ घोडके (६२९),ग्रामपंचायत मतदार संघात अनिल सुभाष पाटील (६०१), शिवाजी किसनराव देशमुख(६०९), अनुसुचीत जाती मतदार संघात बालाजी हरिश्चंद्र वाघमारे (६५०),आर्थिकदृष्टया दुर्बल घटक मतदार संघात सचिन विष्णु सुर्यवंशी (६०५),व्यापारी मतदार संघ बालाप्रसाद बन्सीलाल बिदादा (९४९), सुधीर हरिश्चंद्र गोजमगुंडे (८१९), हमाल व तोलारी मतदार संघात शिवाजी दौलतराव कांबळे (८९७)विजयी झाले आहेत.
तर या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलच्या सहकारी संस्था मतदार संघातील उमेदवार शिंदे विक्रम श्रीधरराव (३३८), बेद्रे उमेश अमृतराव (३३२), शिंदे संतोष मोहनराव (३१९), भिसे बाबासाहेब साहेबराव (३२२), शिंदे शरद माणिकराव (३२१), शिंदे सुरज जगन्‍नाथ (३२४), पिसाळ भैरवनाथ आनंदराव (२५७), महिला मतदार संघातील कदम धनश्री बालासाहेब (३३८), वायाळ स्वयंम संभाजी (३३७), इमाव मतदार संघातील चामले बापुराव लिंगराम (३६९), विमुक्त जाती भटक्या जमाती मतदार संघ सोट भागवतराव श्रीरंगराव (३६२), ग्रामपंचायत मतदार संघ गवळी सुधाकर प्रभाकर (३४९), खंदाडे बाबु हणमंतराव (३९८), अनुसुचित जाती,मतदार संघ सवई संजू बबन (३६९), आर्थिकदृष्टया दुर्बल घटक मतदार संघ कावळे विश्‍वास वसंतराव (३९१), व्यापारी मतदार संघ पाटील दिनकर लक्ष्‍मणराव (७६६), कोरे नितीन सिद्रामअप्‍पा (७३१), हमाल व तोलारी मतदार संघ वाघमारे नागेश रंगराव (४०३) कृषि विकास पॅनलने ही निवडणूक केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचे आशीर्वाद घेऊन लढवली. माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख व लातूर ग्रामिणचे आमदार धीरज विलासराव देशमुख, माजी आमदार वैजनाथ शिंदे, माजी आमदार त्रिबंक भिसे, माजी सभापती ललीतभाई शहा, आबासाहेब पाटील, दिलीपदादा नाडे यांनी प्रमुख प्रचाराची धुरा सांभाळली. लातूर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ॲड. किरण जाधव, जिल्हा परिषदेचे सदस्य धनंजय देशमुख, विलास बॅकेचे उपाध्यक्ष ॲड. समद पटेल, टवेन्टिवन शुगर्सचे व्हा. चेअरमन विजय देशमुख, विलास कारखाना व्हा. चेअरमन रविद्र काळे,
बाजार समिती माजी उपसभापती मनोज पाटील, गोविंद बोराडे, गणेश एसआर देशमुख, गिरीष ब्याळे, रमेश पाटील, राजकुमार पाटील, स्मिता खानापूरे, सपना किसवे हे निरीक्षक व सर्व टीमने निवडणूकीत अहोरात्र परिश्रम घेतले. सर्व उमेदवार एकतर्फी विजयी झाले असून कृषी उत्पन्न बाजार समितीवर पून्हा झेंडा फडकला आहे. उच्चतम कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणूक – २०२३ चे आज शुक्रवार दि. २८ एप्रिल रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत १८ जागांसाठी मतदान यशवंत प्राथमिक विदयालय, ग्यानबा मोरे प्राथमिक शाळा, जिजामाता कन्या प्रशाला या ठिकाणी झाले. यामध्ये ग्रामपंचायत मतदार संघात १०६८ मतदारा पैकी १०६० मतदारांनी, सोसायटी मतदार संघात १०३५ मतदारा पैकी १०१९, व्यापारी मतदार संघात २०५५ मतदारांपैकी १७७४ मतदारांनी तर हमाल मापाडी मतदार संघात १८२५ मतदारांपैकी १५८१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. एकुण मतांची सरासरी टक्केवारी पाहता ९०.३७ टक्के एवढे मतदान झाले. कृषी विकास पॅनल माध्यमातून ही निवडणुक लढवीत असतांना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक काळीजीपूर्वक घेतली. याकरीता उमेदवार निवडीपासूनच चांगले नियोजन केले. विविध संस्थाचे पदाधिकारी, स्थानीक पातळीवर कार्य करणाऱ्या पदाधिकारी वकार्यकर्त्यांना उमेदवारी दिली. आमदार धीरज देशमुख यांनी कल्पक योजनांची माहिती देऊन अदययावत पध्दतीने प्रचार यंत्रणा राबवली.

प्रभावी व नियोजनबध्द प्रचार कृषी विकास पॅनलची निवड झाल्यानंतर गाव पातळीवरील ग्रामपंचायतीचे सरपंच,उपसरपंच, सदस्य व विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक या सर्व पदाधिकाऱ्यांना माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी एकत्र करून प्रचारास सुरुवात केली. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी गावभेट, मतदार भेट, पदाधिकारी व मतदार मेळावा आयोजित करून प्रभावी प्रचार यंत्रणा राबवली. लातूर बाजार समितीसह जिल्हा परिषद सर्कल मधील इतर सर्व शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी (तोलारी), महिला कामगार, मतदार बंधू-भगिनीची प्रत्यक्ष भेट घेऊन कृषी विकास पॅनल लातूरच्या उमेदवाराकडून संवाद साधला गेला. विशेष म्हणजे सहकारीतील सर्व संस्थाचे पदाधिकारी प्रचारात पूर्णपणे सक्रीय राहिले याचा फायदा कृषि विकास पॅनलला मिळाला आहे.

जाहीरनामा व वचनपूर्ती
लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक सुरू झाल्यापासून विरोधकांचे पॅनल करणे, उमेदवार निवडणे यात मोठ्या प्रमाणात गोंधळ होता. माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी मात्र केलेल्या कामाची वचनपूर्ती व भविष्यात करावयाच्या कामाचा जाहीरनामा मांडला. प्रचारात विरोधकांवर टीका न करता आपण केलेले काम त्यांनी मतदारापर्यंत पोहोचवले त्यामुळे मतदारांचा यांना कौल मिळाला आहे.

शेतकऱ्यांसाठीच्या योजनांना मतदारांचा प्रतिसाद कृषि उत्पन्न बाजार समिती ज्याच्या जीवावर चालते त्या शेतकऱ्यासाठी व शेती विकासासाठी अनेक योजना राबवण्याचे आश्वासनही कृषि विकास पॅनलच्या वतीने या जाहीरनाम्यात देण्यात आले होते. यामध्ये कृषि परिषद, शेतकरी मेळावे, शिवारफेरी आयोजन करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन, पारंपरिक
बियाण्याच्या बॅंकेची ऊभारणी, अदययावत कृषि अवजारांची उपलब्धता, सेंद्रींय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन, सेंद्रींय भाजीपाला विक्रीसाठी प्रायोगिक तत्त्वावर डायल फॉर भाजीपाला योजना, कृषि क्षेत्रातील माहिती व घडामोडी कळण्यासाठी कृषि ग्रंथालय, कृषिमाल साठवणुकीसाठी कार्यक्षेत्रात विभागनिहाय गोडाऊन, शेतीमाल वर्गीकरण, स्वच्छता व पॅकेजिंग युनीट, ई मार्केट कृषि माल विपणन सेवा, निर्यात मार्गदर्शन व सुविधा केंद्र, शेतकरी, गुमास्ते, हमाल, माफाडी यांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्या संबंधी आश्वासन या जाहीरनाम्यात दिले. या सर्वांना चांगला प्रतिसाद मतदारांकडून मिळाला आणि यामुळे कृषिविकास  पॅनलला विजय पताका फडकवण्यात यश मिळाले.

आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या विचारांचा विजय माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख

लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत माजी मुख्यमंत्री आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांच्या विचाराप्रमाणे कृषि विकास पॅनलच्या वतीने आजवर केलेले काम आणि भविष्यात राबवयाच्या योजानंचे नियोजन सांगून प्रचार केला, मतदारांनी या विचाराला प्राधान्य दिले त्यामूळेच या पॅनलचे सर्वच्या सर्व १८ उमेदवार मोठया फरकाने विजयी झाले आहेत, अशी प्रतिक्रीया माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी व्यक्त केली आहे. कृषि विकास पॅनलच्या दणदणीत विजयावर प्रतिक्रीया व्यक्त करतांना माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले आहे की, आजवर लातूर तालुक्याचा कोणी विकास केला आणि यापूढे कोण करू शकतो याची जाण लातूरच्या
सूजाण नागरीकांना आहे. कोणतीही निवडणूक लोकशिक्षणाचे साधन असते. चांगले वाईट सांगण्याची संधी यानिमित्ताने मिळते, लातूरच्या विकासासाठी नेत्यांनी उभा केलेल्या संस्था, त्यातून या भागात घडलेले परीवर्तन हे येथील नागरीकांनी पाहिले व अनुभवले आहे. लातूरचे अर्थकारण मजबूत करणाऱ्या कृषि उत्पन्न्‍ बाजार समितीच्या मागच्या
कार्यकाळात झालेली विकासकामे आणि पूढे राबवयाच्या योजना याचा वचनपूर्तीसह जाहीरनामा तयार करून कृषिविकास पॅनलच्या वतीने मतदारांसमोर मांडला. मतदारांना हा सकारात्मक प्रचार चांगलाच भावला. विरोधकांच्या भुलथापा आणि अपप्रचाराला त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यांनी कृषि विकास पॅनलला भरभरून मतदान केले आहे असे सांगून आमदार देशमुख यांनी सर्व मतदार तसेच या निवडणूकीत परिश्रम घेतलेले पदधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक यांचे अभिनंदन करून मनपुर्वक आभार मानले आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed