• Tue. Apr 29th, 2025

जिया खान मृत्यूप्रकरणात सूरज पांचोली निर्दोष; तब्बल 10 वर्षे चालला खटला

Byjantaadmin

Apr 28, 2023

jiha khan मृत्यू प्रकरणात सूरज पांचोलीची  (Sooraj Pancholi) निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. पुराव्यांअभवी सूरजची निर्दोष मुक्तता करण्यात आली. कोर्टानं जियाची आई राबिया खान यांना या निकालाल आव्हान देण्याची मुभा मात्र कायम ठेवली आहे

Actor Sooraj Pancholi acquitted of abetment charges  in Jiah Khan suicide case Jiah Khan suicide case: जिया खान मृत्यूप्रकरणात सूरज पांचोली निर्दोष; तब्बल 10 वर्षे चालला खटला

10 वर्षांच्या  प्रतिक्षेनंतर विशेष सीबीआय न्यायालयाने अभिनेता सूरज पांचोलीला जिया खान मृत्यूप्रकरणात निर्दोष घोषित केलं आहे. सूरज पांचोलीवर बॉलिवूड अभिनेत्री जिया खानला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप  करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास आधी मुंबई पोलीस करत होते आणि त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. पुराव्यांअभवी हे न्यायालय सूरज पांचोलीला दोषी ठरवू शकत नाही, त्यामुळे त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे, असे मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश ए.एस. सय्यद म्हणाले.

3 जून 2013 रोजी जिया खानने मुंबईतील जुहू येथील तिच्या अपार्टमेंटमध्ये आत्महत्या केली.जिया खानच्या घरातून सहा पानांची सुसाईड नोट सापडली. या सुसाईड नोटमध्ये जियानं सूरजवर अत्याचार, फसवणूक आणि खोटे बोलणे यासह अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. जिया खानची आई राबिया खान यांनी देखील सूरजवर काही गंभीर आरोप केले होते. मृत्यू प्रकरणातून सूरजची निर्दोष मुक्तता झाली आहे.

सूरज पांचोलीनं या चित्रपटांमध्ये केलं काम

सूरजनं 2015 मध्ये रिलीज झालेल्या हिरो या चित्रपटामधून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं.  टाइम टू डान्स, हवा सिंह या चित्रपटामध्ये देखील सूरजनं काम केलं. गुजारिश, एक था टायगर यांसारख्या चित्रपटांचा सूरज हा असिस्टंट डायरेक्टर होता.

जियानं वयाच्या 18 व्या वर्षी  राम गोपाल वर्मा यांच्या ‘निशब्द’ या चित्रपटामधून अभिनयक्षेत्रात पदार्पण केले.  हा चित्रपट 2007 मध्ये रिलीज झाला. ज्यासाठी तिला फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. या चित्रपटात तिनं अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रिन शेअर केली.

2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या  गजनी या चित्रपटात जियानं काम केलं. त्यानंतर 2010 मध्ये रिलीज झालेल्या हाऊसफुल या रोमँटिक आणि कॉमेडी चित्रपटात तिनं प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटात तिनं अक्षय कुमार, रितेश देशमुख, दीपिका पादुकोण या कलाकारांसोबत स्क्रिन शेअर केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed