दिल्ली हायकोर्टाकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना दिलासा दिला आहे. 2008 सालच्या एका प्रकरणात बोकारो कोर्टानं राज ठाकरेंना समन्स बजावलं होतं. याप्रकरणी सुनावणी दरम्यान दिल्ली हायकोर्टानं समन्स रद्द केलं आहे.
दिल्ली हायकोर्टाकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना दिलासा दिला आहे.MNS चे अध्यक्ष राज ठाकरे यांना कथित भडकाऊ भाषण केल्याबद्दल झारखंडच्या बोकारो कोर्टानं बजावलेलं समन्स दिल्ली उच्च न्यायालयानं रद्द केलं आहे. न्यायमूर्ती जसमीत सिंह यांच्या खंडपीठानं यासंदर्भात निर्णय दिला. विश्वास आणि धर्माबाबत बोलताना अधिक सावधगिरी बाळगावी लागते. त्याद्वारे एखाद्या व्यक्तीच्या विचारांना धक्का लावता येत नाही, किंवा चिथावणी दिली जाऊ शकत नाही, असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं आहे.