कृषी विकास पॅनलच्या उमेदवारांकडून मतदारांच्या भेटीगाठी,
सर्व मतदारसंघातील मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
लातूर प्रतिनिधी : बुधवार दि. २६ एप्रिल २०२३
उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरची निवडणूक २०२३ आता अंतिम
टप्प्यात पोहचली असून ही निवडणूक लढवत असलेल्या कृषी विकास पॅनल
लातूरच्या सर्वच आठरा उमेदवारांनी प्रत्यक्ष मतदारांच्या भेटीगाठी
सुरूवातीपासून घेण्यास सुरुवात केली, सर्व उमेदवारांना आपापल्या गटातून
मतदारांचा उत्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक २०२३ लातूर करीता १८
संचालक पदासाठी शुक्रवार दि. २८ एप्रिल रोजी मतदान होत आहे. या
निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु असून प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे.
कृषी विकास पॅनल लातूरचा जाहीरनामा आणि मागील निवडणुकीत दिलेल्या
आश्वासनांची वचनपूर्ती या विषयीचे पत्रक आणि केलेल्या कामाची माहिती देत
कृषी विकास पॅनल लातूरच्या सर्व १८ उमेदवारांनी आपापल्या जिल्हा परिषद
सर्कल निहाय मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेतल्या आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या निवडणुकीसाठी जवळपास २५०
पदाधिकाऱ्यांनी कृषि विकास पॅनलकडे उमेदवारी मागितली होती, परंतु फक्त १८
उमेदवार निवडावयाचे असल्यामुळे पात्र असूनही सर्वांना संधी देता आली नाही
असे असले तरी उमेदवारी मिळालेले आणि उमेदवारी न मिळालेले देखील सर्वांनी
एकदिलाने माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, सहकार महर्षी
माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख,
आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या मरर्गदर्शनाने स्वतःला निवडणूक
प्रचार कार्यात झोकून दिल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
लातूर बाजार समितीसह जिल्हा परिषद सर्कल मधील इतर सर्व शेतकरी,
व्यापारी, हमाल, मापाडी (तोलारी), महिला कामगार, मतदार बंधू-भगिनीची
प्रत्यक्ष भेट घेऊन कृषी विकास पॅनल लातूरच्या उमेदवाराकडून संवाद साधला
गेला. विशेष म्हणजे सहकारीतील सर्व संस्थाचे पदाधिकारी प्रचारात पूर्णपणे
सक्रीय राहिले याचा फायदा निश्चीत कृषि विकास पॅनलला मिळणार आहे.
शेतीमालाला योग्य भाव मिळवून देणारी लातूरची बाजार समिती असून या बाजार
समितीचा राज्यात आणि देशात एक लौकिक आहे आणि तो टिकवून ठेवणे आणि वाढविणे
ही आपली सर्वांची एकत्रित जबाबदारी आहे असे सांगत प्रचंड मताधिक्याने
कृषी विकास पॅनल लातूरच्या “नंदीबैल” या निवडणूक चिन्हावर शिक्का मारून
सर्व १८ उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन या भेटीगाठीच्या माध्यमातून
केले जात आहे, याला सर्वच गटातील मतदारातून देखील उत्स्फूर्त प्रतिसाद
मिळत आहे.
——————————