• Wed. Apr 30th, 2025

महाबळेश्वर, पाचगणी प्लास्टिक मुक्त करण्यासाठी उपाययोजना करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Byjantaadmin

Apr 26, 2023

सातारा  – प्लास्टिक हे आरोग्यासाठी नाही तर पर्यावरणासाठी ही हानिकारक आहे. त्यामुळे महाबळेश्वर पाचगणी ही गिरिस्थाने प्लास्टिक मुक्त करण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाचगणी व इतर परिसरातील पर्यटन विषयक विविध विभागांकडील प्रलंबित कामांचा आढावा बैठक राजभवन, महाबळेश्वर येथे संपन्न झाली. त्यावेळी मुख्यमंत्री श्री शिंदे बोलत होते.

यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिल्लारी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

अस्तित्वात असलेले रस्ते दुरुस्तीसाठी वन विभागाने परवानगी विचारू नये अशा सूचना देऊन मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, मंजूर केलेल्या कामांच्या लवकरात लवकर निविदा काढाव्यात, पार्किंगला शिस्त लावण्यासाठी उपाययोजना कराव्यात, त्यासाठी नगरपरिषदेने शंभर वाहतूक वॉर्डन पूर्वावेत, पाचगणी महाबळेश्वर रस्त्यावरील अतिक्रमणे हटवित, साबणे रस्त्याचे काम नियोजन प्रमाणे गटार ते गटार करण्यात यावे अशा सूचनाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिल्या.

बैठकीमध्ये वेण्णा लेक परिसर विकास, पार्किंग, तसेच सुशोभीकरण या विषयी ही चर्चा करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *