बाजार समितीच्या विकासाची घडी बसवली – अशोकराव पाटील निलंगेकर
मुगाव येथे महाविकास आघाडी ची सभा संपन्न
निलंगा (दि. २५) : निलंगा कृषी उत्पन्न बाजार समिती च्या निवडणूकीत विकासरत्न डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब कृषी विकास पॅनल च्या उमेदवारांच्या प्रचारार्थ निटुर भागातील सोसायटी व ग्रामपंचायत च्या मतदारांची सभा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांच्या उपस्थितीत आज लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय मुगाव येथे संपन्न झाली. याप्रसंगी बोलताना अशोकराव पाटील यांनी सांगितले की आज पर्यंतच्या शासकीय प्रशासकांनी चुकीच्या मार्गाने कामे केल्याने बाजार समिती चे नुकसान झाले. मी सभापती झाल्यापासून बाजार समिती च्या कारभाराची घडी बसवली आहे. तसेच बँकेच्या शाखेसह अनेक कामे प्रगतीपथावर आहेत.
यावेळी मंचावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे सचिव अभय साळुंके, शिवसेनेचे नेते लिंबन महाराज रेशमे, राष्ट्रवादी चे नेते पंडितराव धुमाळ, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने, काँग्रेस चे तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अविनाश रेशमे, काँग्रेस तालुकाकार्याध्यक्ष अँड नारायण सोमवंशी, प्रा. दयानंद चोपणे, सुरेंद्र धुमाळ, इस्माईल लदाफ, सुधाकर पाटील, बालाजी पाटील, बालाजी माने, बालाजी गोमसाळे, लाला पटेल, विक्रम पाटील, श्रीकांत साळुंके हारीदास बोळे, बालाजी भुरे, प्रमोद मरूरे, पंकज शेळके, अँड तिरूपती शिंदे, शिवचरण पाटील, पंडितराव भदरगे, महेश देशमुख, गंगाधर चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.