लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीला आणखी पुढे नेण्यासाठी कृषी विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांचा विजय महत्वाचा – माजी आ. वैजनाथ शिंदे
लातूर प्रतिनिधी- लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समिती आपल्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे पुढे जात असून आपणाला या बाजार समितीला आणखीन पुढे न्यायचे आहे याकरिता उपस्थित सर्व मतदारांनी कृषी विकास पॅनल लातूरच्या सर्वच्या सर्व आठरा उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन माजी आमदार वैजनाथ शिंदे यांनी केले आहे चिकुर्डा या ठिकाणी आयोजित प्रचार मेळाव्यात ते बोलत होते .
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री, तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर निवडणूक २०२३ अनुषंगाने,रविवार दिनांक २३ एप्रिल रोजी कृषी विकास पॅनल लातूर उमेदवारच्या प्रचारार्थ लातूर तालुक्यातील चिकुर्डा येथिल निर्मलादेवी काळे विद्यालय प्रांगणात जिल्हा परिषद सर्कलमधील काटगाव, गादवड, निवळी, मुरुड, एकुर्गा, येथील ग्रामपंचायतचे सरपंच, पदाधिकारी, व सोसायटीचे पदाधिकारी
यांचा व्यापक मेळावा घेण्यात आला .यावेळी बोलताना लातूर ग्रामीणचे माजी आमदार वैजनाथ शिंदे म्हणाले की, माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लातूर बाजार समितीची २०२३ ची निवडणूक होत असून मागील काही वर्षात लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समिती आपल्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे पुढे जात आहे आपणाला या बाजार समितीला आणखीन पुढे न्यायचे आहे, शेतकरी, व्यापारी,हमाल,मापाडी,महिला कामगार यांचा सर्वांगीण विकास देखील साध्य करायचा आहे. लातूर बाजार समितीत लातूर सह इतर जिल्हे व शेजारील राज्यातून मोठ्या प्रमाणात शेतीमाल विक्रीसाठी येतो, आलेल्या शेतीमालाला चांगला भावही मिळतो तसेच शेतीमालाच्या विक्री आधी शेतकर्यांच्या गरजेनुसार अनामत रक्कम शेतकर्याला लातूर बाजार समिती देते यामुळेच मालाची आवक आणि शेतकऱ्यांचा विश्वास वाढत आहे हे पाहता भविष्यात कधी दुर्दैवाने लातूरमधील १२० गावात नैसर्गिक आपत्ती आली तर शेतकऱ्यांना बाजार समितीकडून मदत केली जावी असा लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीने एक नवीन निर्णय घ्यावा अशी मागणी करून माजी मंत्री आमदार अमित
विलासराव देशमुख यांनी कोरोना काळात आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट काम केले लातूर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था व्यवस्थित केली. म्हणून आता पंतप्रधानांच्या हस्ते जिल्हाधिकारी लातूर यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले याची आठवण करून देत प्रचार मेळाव्यास उपस्थित असलेल्या सर्व मतदारांनी कृषी विकास पॅनल लातूरच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन माजी आमदार वैजनाथ शिंदे यांनी याप्रसंगी केले.
यावेळी आबासाहेब पाटील,ललितभाई शहा,मनोज पाटील,रामराम ढगे,धनंजय देशमुख,दिलीपदादा नाडे, स्वयंप्रभाताई पाटील, विजय देशमुख, रवींद्र काळे, बळवंत काळे, बाळासाहेब कदम, गोविंद बोराडे, ज्ञानदेव पाटील, सुरेशराव कदम, अशोकराव काळे, विश्वास कदम यांच्यासह कृषी विकास पॅनलचे सर्व उमेदवार, निरीक्षक, ग्रामपंचायत ,पदाधिकारी, विविध कार्यकारी सोसायटीचे पदाधिकारी, जिल्हा परिषद सर्कलमधील काटगाव, गादवड, निवळी, मुरुड, एकुर्गा येथील मतदार, शेतकरी, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.