निवडणुका आल्या कि केवळ पॅनल उभा करणारे विरोधक,सर्व संस्था चांगल्या चालण्यासाठी कृषी विकास पॅनलला विजयी करा – माजी आ. त्र्यंबक भिसे
लातूर प्रतिनिधी –निवडणुका आल्या कि केवळ पॅनल उभा करणारे विरोधक असून आपल्या सर्व सहकारी संस्था अधिक चांगल्या प्रकारे चालाव्यात याकरिता कृषी विकास पॅनल
लातूरच्या सर्व उमेदवाराना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन माजी आ.त्र्यंबक भिसे यांनी केले लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक २०२३ अनुषंगाने आयोजित प्रचार मेळाव्यात आमदार त्र्यंबक भिसे बोलत होते.
राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री,तथा लातूरजिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर निवडणूक २०२३ अनुषंगाने कृषी विकास पॅनल लातूरच्या उमेदवार प्रचारर्थ रविवार दिनांक २३ एप्रिल रोजी लातूर तालुक्यातील चिकुर्डा येथील निर्मलादेवी काळे विद्यालय प्रांगणात जिल्हा परिषद सर्कलमधील काटगाव, गादवड, निवळी, मुरुड, एकुर्गा, येथील ग्रामपंचायतचे सरपंच, पदाधिकारी, व सोसायटीचे पदाधिकारी
यांचा व्यापक मेळावा संपन्न झाला. या प्रचार मेळाव्याच्या प्रारंभी माजी मुख्यमंत्री लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेला मान्यवरानी पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी बोलताना माजी आमदार त्र्यंबक भिसे म्हणाले की, विरोधी पक्ष कुठलीही निवडणूक आली की केवळ पॅनल उभे करतात. त्यांनी गूळ फॅक्टरी काढली नाही, शिराळा कारखाना सुरू झाला नाही परंतु आदरणीय लोकनेते विलासराव देशमुख, माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, स्वर्गीय बब्रुवान काळे साहेबांनी मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना उभारला. लातूरची जिल्हा बँक चांगले काम करत आहे. आपल्या सर्व संस्था चांगल्या प्रकारे चालत आहेत आणि या सर्व संस्था अधिक चांगल्या प्रकारे चालाव्यात लातूर जिल्ह्यातील शेतकरी,व्यापारी,हमाल,मापाडी,महि
मतदारांनी कोणत्याही भूल थापांना बळी न पडता कृषी विकास पॅनलला प्रचंड मताने विजयी करावे असे आवाहन त्यांनी या वेळी केले.
यावेळी आबासाहेब पाटील,ललितभाई शहा,मनोज पाटील,रामराम ढगे,धनंजय देशमुख,दिलीपदादा नाडे, स्वयंप्रभाताई पाटील, विजय देशमुख, रवींद्र काळे, बळवंत काळे, बाळासाहेब कदम, गोविंद बोराडे, ज्ञानदेव पाटील, सुरेशराव कदम, अशोकराव काळे, विश्वास कदम, कृषी विकास पॅनलचे सर्व उमेदवार,निरीक्षक, ग्रामपंचायत पदाधिकारी, विविध कार्यकारी सोसायटी पदाधिकारी,जिल्हा परिषद सर्कलमधील काटगाव, गादवड, निवळी, मुरुड, एकुर्गा जिल्हा परिषद सर्कल मधील मतदार शेतकरी काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल इंगळे पाटील यांनी केले तर
शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार व्हा. चेअरमन रवींद्र काळे यांनी मानले.