• Fri. May 2nd, 2025

खरीप हंगामासाठी महाबीजचा बिजोत्पादन कार्यक्रम आरक्षण योजना सुरु

Byjantaadmin

Apr 25, 2023

खरीप हंगामासाठी महाबीजचा बिजोत्पादन कार्यक्रम आरक्षण योजना सुरु

शेतकऱ्यांनी खरीप 2023-24 हंगामासाठी  महाबीजचा बिजोत्पादन कार्यक्रमातंर्गत आरक्षण करुन घ्यावेत -महाबीज जिल्हा व्यवस्थापक यांचे आवाहन 

 

 

लातूर,  (जिमाका):  खरीप 2023-24 हंगामासाठी महाबीजमार्फत सोयाबीन जेएस -335, स्वर्णसोया MAUS-158 KDS-726, KDS-753, MAUS-71, MAUS-612 ईत्यादी तसेच उडीद AKU-10-01, TAU-1 व तुर BDN-711 BDN – 716, ज्यूट JRO-524 मुग BM-2002-1 या पिक वाणाचे बिजोत्पादन कार्यक्रम आरक्षण योजना चालु झाली आहे.

सदरील आरक्षण योजनेचा कालावधी दिनांक 17 एप्रिल,2023 ते 10 मे, 2023 असा आहे. सदरील बिजोत्पादन कार्याक्रमासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या धर्तीवर बिजोत्पादन कार्यक्रम देण्यात येईल. बिजोत्पादन कार्याक्रमासाठी एका गावात कमीत कमी सर्व पिक वाण व दर्जा मिळूण 50 एकर क्षेत्र होणे आवश्यक आहे. महाबीजचे बियाणे खरेदी धोरण व इतर अटी मान्य असलेल्या बिजोत्पादकांना बिजोत्पादन कार्यक्रम देण्यात येईल.

तसेच बिजोत्पादन कार्यक्रम आवंटीत करण्याचा अधिकार महाबीजकडे राखीव ठेवण्यात आलेला आहे. एका बिजोत्पादकास एका पिकाचे एका वाणाचाच बिजोत्पादन कार्यक्रम घेता येईल. बिजोत्पादन कार्यक्रम घेण्यासाठी तीन महिन्याच्या आतील सातबारा व आठ अ उतारा, अधारकार्डची झेरॉक्स प्रत व आधारकार्ड लिंक असलेल्या बँक पासबुक आयएफएससी कोड (IFSC CODE) असलेली झेरॉक्स प्रत जोडून मागणी अर्ज भरून बिजोत्पादन कार्यक्रम घेता येईल. त्यासाठी बिजोत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या तालुक्यातील कृषि क्षेत्र अधिकारी यांना जिल्हा कार्यालय महाबीज, कृषि उत्पन्न बाजार समिती, तळमजला, मार्केट यार्ड, शिवनेरी गेट, लातूर येथे व अहमदपुर, उदगीर, जळकोट या तालुक्यातील शेतकऱ्यांनी बिजप्रकीया केंद्र, ग्रामपंचायात गोदाम, शिरूर ताजबंद ता. अहमदपुर जि. लातुर येथे संपर्क करून वरीलप्रमाणे कागदपत्रे सादर करून बिजोत्पादन कार्यक्रम आरक्षण करून घेण्यात यावे.

तसेच बिजोत्पादन कार्यक्रम आरक्षण उपलब्ध असेपर्यतच देण्यात यईल, याची नोंद घेण्यात यावी. तरी सर्व बिजोत्पादकांनी महाबीजच्या खरीप 2023-24 हंगामाचे बिजोत्पादन कार्यक्रम आरक्षण करून घेण्याचे आवाहन महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक आर. एस. मोराळे लातूर यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *