• Fri. May 2nd, 2025

कृषी विकास पॅनल लातूरच्या सर्व उमेदवाराना प्रचंड मताधिक्क्याने विजयी करा- दिलीपदादा नाडे

Byjantaadmin

Apr 25, 2023

कृषी विकास पॅनल लातूरच्या सर्व उमेदवाराना प्रचंड मताधिक्क्याने विजयी करा- दिलीपदादा नाडे

लातूर प्रतिनिधी -लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्वांगीण विकासाठी मतदारांनी कृषी विकास पॅनल लातूरच्या सर्वच्या सर्व आठरा उमेदवारांना
भरघोस मताधिक्क्याने विजयी करावे असे आवाहन दिलीपदादा नाडे यांनी केले, चिकुर्डा या ठिकाणी आयोजित प्रचार मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते.

राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर निवडणूक २०२३ अनुषंगाने कृषी विकास पॅनल लातूर उमेदवारांच्या प्रचारर्थ रविवार दिनांक २३ एप्रिल रोजी लातूर तालुक्यातील चिकुर्डा येथील निर्मलादेवी काळे विद्यालयच्या प्रांगणात जिल्हा परिषद सर्कलमधील  काटगाव, गादवड, निवळी, मुरुड, एकुर्गा, येथील ग्रामपंचायतचे सरपंच, पदाधिकारी,सोसायटी पदाधिकारी
यांचा व्यापक मेळावा संपन्न झाला. या प्रचार मेळाव्याच्या प्रारंभी माजी मुख्यमंत्री लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.यावेळी बोलताना दिलीपदादा नाडे म्हणाले की, लातूर जिल्ह्यातील साखरउद्योग, जिल्हा बँक टिकली पाहिजे हि आमची इच्छा असून लातूर जिल्ह्यातील
सहकार हा काँग्रेस पक्षाच्या नेत्यामुळे आजतागायत टिकून आहे. जिल्हा बँक शेतकऱ्यांसाठी उत्कृष्ट काम करत आहे, लातूर बाजार समितीच्या आज १०० कोटीच्या ठेवी आहेत यावरूनच ही संस्था किती चिकाटीने चालवली हे स्पष्ट होते. सर्वांच्या सहकार्याने कष्टातून मोठ्या केलेल्या संस्था आपण अशाच कशा विरोधकांच्या ताब्यात घ्यायच्या याचा विचार व्हायला आपण सर्वांनी करायला हवा. या संस्था ताब्यात घेण्यासाठी विरोधक प्रयत्न करत आहेत, त्यांचे हे प्रयत्न आपण हाणून पाडले पाहिजेत. लातूर बाजार समिती ही मराठवाड्यातील पहिल्या क्रमांकाची बाजार समिती आहे. या बाजार समितीमुळे जिल्ह्याचा विकास झाला उप बाजारपेठेमुळे मुरुडचाही विकास झाला त्यामुळे या सर्व गोष्टीचा विचार करता सर्व मतदारांनी कृषी विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड अशा मताधिक्क्याने विजयी करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी आबासाहेब पाटील,ललितभाई शहा,मनोज पाटील,रामराम ढगे,धनंजय देशमुख,दिलीपदादा नाडे, स्वयंप्रभाताई पाटील, विजय देशमुख, रवींद्र काळे, बळवंत काळे, बाळासाहेब कदम, गोविंद बोराडे, ज्ञानदेव पाटील, सुरेशराव कदम, अशोकराव काळे, विश्वास कदम, कृषी विकास पॅनलचे सर्व उमेदवार, निरीक्षक, ग्रामपंचायत पदाधिकारी, विविध कार्यकारी सोसायटी पदाधिकारी, जिल्हा परिषद सर्कलमधील काटगाव, गादवड, निवळी, मुरुड, एकुर्गा येथील मतदार, शेतकरी, काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी,कार्यकर्ते,सदस्य मोठ्या संखेने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल इंगळे पाटील यांनी केले तर शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार व्हा. चेअरमन
रवींद्र काळे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *