• Fri. May 2nd, 2025

सासरवाडीतच मविआचा अजित पवारांना धक्का; पोस्टरवरून फोटो गायब, पुन्हा चर्चेला उधाण!

Byjantaadmin

Apr 23, 2023

OSMANABAD : गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे नाराज असून ते भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र या चर्चेचा त्यांना फटका बसत आहे का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. राष्ट्रवादीच्या मुंबई विभागाच्या शिबीरामध्ये अजित पवार यांचं नाव नव्हतं. त्यानंतर कर्नाटक निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून जी स्टार प्रचारकांची यादी तयार करण्यात आली त्यामधून देखील अजित पवार यांचं नाव वगळण्यात आलं. आणि आता प्रचारासाठी मविआकडून लावण्यात आलेल्या पोस्टरवरून देखील त्यांचं नाव गायब आहे. यामुळे चर्चेला चांगलंच उधाण आलय.

निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात

कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीतील निवडणुकीच्या प्रचार शुभारंभ सभेच्या पोस्टरमधून अजित पवार यांचा फोटो गायब आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचाराचा शुभारंभ शनिवारी झाला. या सभेला ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्यासह  काँग्रेस, राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. मात्र या प्रचारसभेसाठी लावण्यात आलेल्या बॅनरवरून अजित पवार यांचा फोटो गायब झाल्याने चर्चेला उधाण आलं आहे.

पोस्टरवरून फोटो गायब 

या बॅनरवर केवळ राष्ट्रवादीकडून शरद पवार यांचा फोटो लावण्यात आला आहे. अजित पवार हे धारशिव जिल्ह्याचे जावई आहेत. धाराशिवच्या राजकारणात पूर्वीपासूनच अजित पवार यांचं वर्चस्व आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच आता मविआच्या पोस्टरवरून अजित पवार यांचा फोटो हटवण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *