ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना सन 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह, शाल, मानपत्र आणि 25 लाख रुपयांचा धनादेश प्रदान करून आप्पासाहेबांना सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यादरम्यान १४ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला. यावरुन राजकारण पेटलं आहे.
काल (शनिवारी) आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने एक पत्र समाज माध्यमांवर प्रसारित झाले आहे. मात्र हे पत्र बनावट असल्याचे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे. असे कुठलेही पत्र डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या वतीने जारी करण्यात आले नसल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. याप्रकरणी पोलिसांत अज्ञातांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या खोट्या व्हायरल पत्रात राज्य सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे केले होते. या पत्रात आपल्याला जबरदस्तीने पुरस्कार घ्यायला लावण्यात आल्याचे म्हटले आहे. पुढे म्हटले आहे की, माझ्या अनुयायांचा मतांसाठी वापर केला.माझ्या साधकांसाठी मंडप टाकला नाही. झालेल्या घटनेची पूर्ण जबाबदारी घेऊन मी श्री सेवकांची माफी मागतो. माझ्या सर्व श्री सेवकांना मी आवाहन करतो की यापुढे BJP आणि शिंदे गटाला मतदान करू नका, असे बनावट पत्रात नमूद करण्यात आले होते.शनिवारी दिवसभर हे पत्र व्हायरल होत होते. हे पत्र बनावट असल्याचे सकृतदर्शनी समोर आले. बदनामीच्या या प्रकरणाची पोलिस कशी दखल घेतात याकडे आता लक्ष आहे. रेवदंडा पोलिस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात संदीप पाटील यांनी तक्रार दाखल केली.
रेवदंडा POLICE ठाण्याचे पोलिस निरीक्षक देविदास मुपडे यांनी ही तक्रार दाखल करून घेतली. सायबर क्राईम अंतर्गत या प्रकरणाचा शोध घेतला जात असल्याची माहिती रायगडचे अप्पर पोलिस अधिक्षक अतुल झेंडे यांनी दिली.
या खोट्या व्हायरल पत्रात राज्य सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उभे केले होते. या पत्रात आपल्याला जबरदस्तीने पुरस्कार घ्यायला लावण्यात आल्याचे म्हटले आहे. पुढे म्हटले आहे की, माझ्या अनुयायांचा मतांसाठी वापर केला. माझ्या साधकांसाठी मंडप टाकला नाही. झालेल्या घटनेची पूर्ण जबाबदारी घेऊन मी श्री सेवकांची माफी मागतो. माझ्या सर्व श्री सेवकांना मी आवाहन करतो की यापुढे भाजप आणि शिंदे गटाला मतदान करू नका, असे बनावट पत्रात नमूद करण्यात आले होते.