कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळी सुरु आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध आमिषे दाखवली जात आहेत,बिल्गी विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार, उद्योगमंत्री मुरुगेश निरानी यांच्याविरोधात मतदारांना आमिष दाखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या साखर कारखान्यातील कर्मचारी वसाहतीतून २१ लाख रुपये आणि चांदीच्या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
उद्योग मंत्री मुरुगेश निरानी भाजपमधील बडे नेते आहेत, जेव्हा बसवराव बोम्मई यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री बनविण्यात आले तेव्हा निरानी यांचेही नाव आघाडीवर होते. या निवडणुकीतही CM CANDATE निरानी यांचे नाव आघाडी असल्याची चर्चा आहे.उद्योग मंत्री निरानी पर यांच्यावर मतदारांना आमिष दाखवल्याचा आरोप असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे POLICE ठाण्याच्या सुत्रांनी सांगितले.
मुख्य निर्वाचन अधिकारी (सीईओ) मनोज कुमार मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुधोल पोलिसांनी २८ किलो वजनाचे चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहे. कर्नाटकमध्ये आचारसंहिता लागू झाल्यानंतर आतापर्यंत २५३ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहे. निरानी यांच्या साखर कारखाना परिसरातून १.८२ कोटी रुपयांची रोकड, ३७.६४ लाख रुपयांच्या भेटवस्तू, ४५.२५ लाख रुपयांची औषधे जप्त करण्यात आली आहे.
निवडणूक आयोगाने आत्तापर्यंत केलेली कारवाई
- ८२.०५ कोटी रुपयांची रोकड जप्त
- १९.६९ कोटीं रुपयांच्या वस्तू
- ५६.६७ कोटी रुपयांची दारु
- १६.५५ कोटी रुपयांचे अंमलीपदार्थ
- ७३.८ कोटी रुपयांचे सोने
- ४.२६ कोटी रुपयांची चादी