• Fri. May 2nd, 2025

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूका-2022 मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर:काही आक्षेप असल्याकस ते संबंधीत तहसील कार्यालयामध्ये दाखल करावेत

Byjantaadmin

Oct 13, 2022

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूका-2022 मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर:काही आक्षेप असल्याकस ते संबंधीत तहसील कार्यालयामध्ये दाखल करावेत
लातूर,दि.13(जिमाका):-मा. राज्यर निवडणूक आयोग महाराष्ट्र८ यांचे आदेश दिनांक ४ ऑक्टोबर, २०२२ अन्विये लातूर जिल्ह्यातील माहे ऑक्टोीबर, २०२२ ते डिसेंबर, २०२२ मध्येग मुदत संपणाऱ्या ३५१ ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका-२०२२ मतदार यादीचा कार्यक्रम देण्याात आलेला आहे. सदरील कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.
निवडणूकीचा टप्पा व टप्पा सुरु करण्याची / पूर्ण करण्यासाठी तारीख पूढील प्रमाणे आहे. प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक गुरुवार 13 ऑक्टोबर, 2022, हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी गुरुवार, दि. 13 ऑक्टोबर, 2022 व मंगळवार, दि. 18 ऑक्टोबर, 2022 व प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिध्द करणे शुक्रवार दि. 21 ऑक्टोबर, 2022 असणार आहे.
मा. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्याक कार्यक्रमानुसार लातूर जिल्ह्या मधील (३५१) ग्रामपंचायतींची प्रारुप मतदार यादी दिनांक १३ ऑक्टोबर, २०२२ रोजी प्रसिद्ध करण्याकत आली आहे. सदरील प्रारुप मतदार यादीचे अवलोकन करुन त्याकवर काही आक्षेप असल्या३स ते संबंधीत तहसील कार्यालयामध्येी दिनांक १३ ऑक्टोबर, २०२२ ते १८ ऑक्टोबर, २०२२ या कालावधीमध्येच कार्यालयीन वेळेत दाखल करावेत, असे आवाहन जिल्हा‍धिकारी लातूर यांच्याकडून करण्यायत येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *