• Fri. May 2nd, 2025

राज्‍य सरकारकडुन शेतक-यांना दिवाळीपूर्वी दिलासा ; लातूर जिल्‍हयातील शेतक-यांना २९० कोटीच्‍या मदतीचा शासन आदेश जारी

Byjantaadmin

Oct 13, 2022

राज्‍य सरकारकडुन शेतक-यांना दिवाळीपूर्वी दिलासा

२९० कोटीच्‍या मदतीचा शासन आदेश जारी , माजीमंत्री आ.निलंगेकरांनी मानले आभार

 

लातूर प्रतिनिधी:-यंदाच्‍या खरीप हंगामात शेतक-यांना अतिवृष्‍टी, सततचा पाऊस आणि कीडरोग प्रादुर्भावाला सामोरे जावे लागले होते. परिणामी शेतक-यांच्‍या हातातून खरीपाचा हंगाम गेलेला आहे. त्‍यामुळेच शेतक-यांना राज्‍य सरकारकडुन मदत मिळणे अपेक्षित होते. त्‍यानुसार शेतक-यांच्‍या हिताला प्राधान्‍य देणा-या मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतक-यांना मदत जाहीर केली. या मदतीच्‍या अनुषंगाने सततच्‍या पावसाच्‍या नुकसान भरपाईपोटी राज्‍य शासनाने लातूर जिल्‍हयातील शेतक-यांना २९० कोटीच्‍या मदतीचा शासन आदेश जारी केलेला आहे. यामुळे राज्‍य सरकारकडुन शेतक-यांना दिवाळीपूर्वी दिलासा मिळालेला असुन याबददल माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फेसबुक लाईव्‍हच्‍या माध्‍यमातून आभार मानले आहेत.

शेतकरी हिताला प्राधान्‍य देत त्‍यांच्‍या मदतीला आणि संकटात धावून जाणा-या मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री देंवेद्र फडणवीस यांच्‍या नेतृत्‍वातील राज्‍य सरकारने पुन्‍हा एकदा राज्‍य सरकार शेतक-यांच्‍या पाठीशी खंबीरपणे उभे असल्‍याचे दाखवून दिले आहे. यंदाच्‍या खरीप हंगामात शेतक-यांना अतिवृष्‍टी, सततचा पाऊस आणि कीडरोग प्रादुर्भावाला सामोरे जावे लागले होते. यामुळे लातूर जिल्‍हयातील शेतक-यांच्‍या हातातून खरीपाचा हंगाम गेलेला होता. परिणामी शेतकरी मोठया अडचणीत आलेला होता. या परिस्थितीत शेतक-यांना मदत करणे गरजेचे असल्‍याचे सांगत याकरीता माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांच्‍यासह जिल्‍हयातील भाजपाच्‍या इतर आमदार व पदाधिकारी यांनी सरकारकडे पाठपुरावा केला. या पाठपुराव्‍याच्‍या माध्‍यमातून मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व निकष बाजूला ठेवत शेतक-यांना मदत देण्‍याचा निर्णय घेतला. ही मदत तीन टप्‍यात देण्‍यात आलेली आहे. त्‍यानुसार पहिल्‍या टप्‍यात अतिवृष्‍टी आणि दुस-या टप्‍यात शंखी गोगलगायमुळे झालेल्‍या नुकसानी पोटी देण्‍यात आली. मात्र विरोधाला विरोध करणा-या काही राजकीय पक्षातील मंडळींनी रस्‍त्‍यावर येवून शेतक-यांना मदतीपासून वंचित ठेवल्‍याचा आरोप करत आंदोलन करण्‍याचे प्रयत्‍न केले. वास्‍तविक या आंदोलनामध्‍ये शेतक-यांचा कोणताच सहभाग दिसून आलेला नव्‍हता. कारण की, राज्‍य सरकार शेतकरी हिताचे आहे.आणि त्‍यांच्‍याकडुन निश्चितच सर्वच नुकसान झालेल्‍या शेतक-यांना भरपाई मिळेल असा विश्‍वास होता असे माजीमंत्री आ. निलंगेकर यांनी यावेळी संवाद साधताना सांगितले.

शेतक-यांचा विश्‍वास सार्थ ठरवत तिस-या टप्‍यातील म्‍हणजेच सततच्‍या पावसामुळे नुकसान झालेल्‍या भरपाईपोटी २९० कोटीच्‍या मदतीचा शासन आदेश आज जारी केले असल्‍याचे माजीमंत्री आ .निलंगेकर यांनी यावेळी सांगितले. राज्‍य सरकारकडुन शेतक-यांना मदत करत असताना राजकीय मतभेद बाजूला ठेवत सर्वच शेतक-यांना या माध्‍यमातून मदत देवू केलेली आहे. सदर मदत दिवाळीपूर्वीच राज्‍य सरकारकडुन प्राप्‍त होणार असल्‍याने शेतक-यांना दिलासा मिळालेला आहे. या मदतीचा शासन आदेश जारी केल्‍याबददल माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या नेतृत्‍वातील राज्‍य सरकारचे आभार व्‍यक्‍त केलेले आहे. आगामी काळातही राज्‍य सरकार शेतक-यांच्‍या पाठीशी खंबीरपणे उभे राहील असा विश्‍वास संवाद साधत असताना माजीमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्‍यक्‍त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *