• Wed. May 7th, 2025

महात्मा बसवेश्वर जयंती निलंगा शहरात विविध सामाजिक, विधायक व प्रबोधनात्मक कार्यक्रमातून मोठ्या उत्साहात साजरा

Byjantaadmin

Apr 22, 2023
महात्मा बसवेश्वर जयंती निलंगा शहरात विविध सामाजिक, विधायक व प्रबोधनात्मक कार्यक्रमातून मोठ्या उत्साहात साजरा
निलंगा:- समतानायक महात्मा बसवेश्वर जयंती निलंगा शहरात विविध सामाजिक, विधायक व प्रबोधनात्मक कार्यक्रमातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
बसव जन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने निलंगा येथे बसव जयंती निमित्त शुक्रवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 47 जणांनी रक्तदान केले. सायंकाळी प्रा. डॉ. भीमराव पाटील यांचे वचन साहित्य व भारतीय संविधान एक अनुबंध या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. याप्रसंगी मठाधिपती संगणबसव महास्वामीजी, दादापीर दर्ग्याचे  सज्जादे सय्यद हैदरवली कादरी मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमात औसा तालुक्यातील टाका येथील एमपीएससी परीक्षेतील  यशप्राप्त गुणवंत विद्यार्थिनी  ज्ञानेश्वरी सूर्यकांत तोळमारे यांचा त्यांच्या  आई वडीलांचा सत्कार करण्यात आला. शनिवारी सकाळी महात्मा बसवेश्वर सार्वजनिक वाचनालय अनुभव मंटप  बसवेश्वर नगर येथे जेष्ठ नागरिक व मान्यवरांच्या उपस्थितीत बसव प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी शिवाजी रेशमे गुरुजी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
संगम बसव विरक्त मठ येथे मठाधिपती संगणबसव महास्वामीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत रत्नेश्वर गताटे यांच्या हस्ते  ध्वजारोहण करण्यात आले.
लिंगायत स्मशानभूमीचे शिवधाम असे नामकरण करून या ठिकाणी  शांतीवन टीमचे  दत्ता शाहीर, प्रल्हाद बाहेती, प्रा. डॉ. गजेंद्र तरंगे, नाना देशपांडे, डॉ. किरण बाहेती, सुनील टोम्पे, डॉ.विक्रम कुडूंबले, शिवप्रसाद मुळे, संतोष सोरडे, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, यांच्या हस्ते  वृक्षारोपण करण्यात आले.
पेठ येथे बसवेश्वर मंदिर पेठ येथे बसव जयंती निमित्त बसवेश्वराचा पाळण्याचा कार्यक्रम अनुभव मंडपाच्या महिलांच्या उपस्थितीत घेण्यात आला. बसवेश्वर चौक येथील नामफलकास  पुष्पहार घालून  अभिवादन करण्यात आले. एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने एस.टी आगार निलंगा येथे बसव प्रतिमेचे पूजन करून पिण्याच्या पाण्याचे फिल्टरचे लोकार्पण करण्यात आले. बसव जयंती निमित्त निलंगा शहरातून भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली. बसवेश्वर नगर ,जिजाऊ चौक ,दापकावेस, संगणबसव मठ,  पेठ, जुने पोलीस ठाणे, आनंदमुनी चौक,  शिवाजी चौक मार्गे लोंढे नगर येथे या रॅलीचा समारोप करण्यात आला. दरम्यान   निलंगा शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. लोंढे नगर येथील संत तुकाराम महाराज मंदिरात विविध पक्ष संघटनेच्या व सामाजिक कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थितीत विचार संगोष्ठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  अशोकराव पाटील निलंगेकर, अभय साळुंखे, पंडितराव धुमाळ, अजित माने, अविनाश रेशमे, रजनीकांत कांबळे ,धम्मानंद काळे, रोहित बनसोडे, दयानंद चोपणे, तानाजी माकणीकर गुरुजी, मनोज कोळळे, गोविंद सूर्यवंशी, लक्ष्मण कांबळे, प्रमोद कदम, एम. एम. जाधव, देवदत्त सुर्यवंशी आदींचा बसव जन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने बसव प्रतिमा देऊन  गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सोमनाथ आग्रे ,राजकुमार चिकराळे, नागनाथ सोरडे, मनोज कोळळे, संतोष सोरडे, इंजिनिअर एम.के.कस्तुरे, धनराज निला, नवनाथ कडूंबले, धनराज स्वामी,राणा आर्य, दत्ता मोहळकर, प्रकाश पटणे, राजकुमार निला,युवराज बिराजदार, प्रकाश शेटकार, देवंग्रे साहेब, बसू सोरडे, मल्लिनाथ कोळळे, बुद्धिवंत मुळे, शिवकुमार रुकारे, दयानंद बेंबरे, शिवकुमार रुकारे, सतीश चाकोते आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *