निलंगा येथे रमजान ईद उत्साही वातावरणात संपन्न
निलंगा(प्रतिनिधी) निलंगा शहर व परिसरात रमजान ईद उत्साही वातावरणात संपन्न झाली. ईदगाह मैदानावर मौलाना महेबूब रशिदी यांनी ईद उल फित्रची नमाज पठण करून विश्वशांतीसाठी प्रार्थना केली. समाजबांधवांनी एकमेकांना गळाभेट देऊन ईद च्या शुभेच्छा दिल्या. ईदच्या पार्श्वभूमीवर समाज बांधवांना वृक्षारोपणासाठी समाज प्रमुखांनी आवाहन केले.
निलंगा शहर मुस्लिम समाजाच्यावतीने काल (शुक्रवार) चंद्रदर्शनाची साक्ष मिळाल्याने आज (शनिवार) ईद साजरी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज ईद करण्यासाठी मुस्लीम धर्मीयांनी तयारी केली. येथील लातुर रस्त्यावरील ईदगाह मैदान येथे आज दहा वाजता नमाज पार पडली. नमाज पठणासाठी शहरातील आबालवृद्ध आणि समाजबांधवांनी ईदगाह मैदान गर्दीने फुलून गेला होता. अल्लाहविषयी कृतज्ञता व्यक्त करत समाजबांधवांनी एकमेकांना
शुभेच्छा दिल्या. समाज प्रमुख निलंगा यांनी समाज बांधवांना आपापल्या घराच्या परिसरात, शेतात, रस्त्याला अडथळा होणार नाही अशा ठिकाणी वृक्षारोपण करून जतन करावे असा संदेश देत आवाहन केले. मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोक पाटील निलंगेकर, काँग्रेस प्रदेश सचिव अभय साळुंखे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष पंडित धुमाळ, लिंबन महाराज रेशमे, काँग्रेस तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील,माजी पंचायत समिती सभापती अजित माने, शिवसेना तालुका प्रमुख अविनाश रेशमे, माजी तालुका प्रमुख ईश्वर पाटील, लालासाहेब देशमुख, प्रल्हाद बाहेती, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, सुधाकर पाटील ,अजित नाईकवाडे, मनोज कोळे, शेषराव ममाळे,लक्ष्मण कांबळे,उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे,पोलिस निरीक्षक शेजाळ बाळकृष्ण ,सपोनि गोविंद राठोड, माजी नगराध्यक्ष हमीद शेख, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष इस्माईल लदाफ, माजी सभापती इरफान सय्यद, नसीम खतीब आदी जण उपस्थित होते