विधवा महिलेच्या घराची भिंत पाडली:कारवाईची मागणी
औसा: विधवा महिलेचे घरकुल इंदिरा आवास योगना २००२-०३ मध्ये पूर्ण झाले असता शिवणी (लख) उपसरपंच व त्यांचा मुलगा घराची भिंत पाडलेली आहे.अशी लेखी तक्रार कोमलबाई धनराज कांबळे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे.
अर्जदार कोमलबाई धनराज गायकवाड यांनी अर्जात नमूद केले की, पंचायत समिती,औसा तर्फे इंदिरा आवास घरकुल योजनत घरकूल मिळाले होते व शिवणी (लख) गावातील उपसरपंच चंद्रकलाबाई बंकट गायकवाड व त्यांचा मुलगा बलभीम बंकट गायकवाङ या दोघानी मिळून माझ्या घराची भिंत बेकायदेशीर व पदाचा दुरुपयोग करून पाडले आहेत माझ्यावर अन्याय केलेले आहेत. मी घरी नसताना एवढाच फायदा घेऊन माझ्या घराच्या सामानाची नासधुस केली आहे.
माझे घर पाडून मला बेघर केले आहे कायदेशीर गुन्हा नोंद व्हावा माझे घर पूर्वी प्रमाणे जसे होते तसे मला करून द्यावे अशी मागणी अर्जदार कोमलबाई धनराज गायकवाड तक्रारी अर्जात केले आहे.तक्रार ची प्रति तहसीलदार औसा,गटविकास अधिकारी पंचायत समिती औसा यांना पण दिले आहे.