डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार १६ एप्रिल रोजी देण्यात आला. त्या कार्यक्रमात उष्माघाताने १४ जणांचा बळी गेला आहे. अशात यावरून होणारे आरोप प्रत्यारोप अद्याप थांबण्याचं नाव घेत नाहीये. जितेंद्र आव्हाड यांनी सरकारच या बळींना जबाबदार आहे, सरकारच्या गर्दी जमवण्याच्या अट्टाहासामुळे हे बळी गेले आहेत अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. तर अजित पवार यांनी या प्रकरणी राज्यपालांना पत्र लिहिलं आहे. आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही यावरून सरकारवर टीका केली आहे. एवढंच नाही तर खारघरच्या कार्यक्रमात १०० पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला आहे असाही गंभीर आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.
काय म्हटलं आहे सुषमा अंधारेंनी?
२५ लाख लोकांचा कार्यक्रम घेण्यात आला. १०० पेक्षा जास्त लोकांचा या कार्यक्रमाच्या दरम्यान लागलेल्या उन्हामुळे इतर गैरसोयींमुळे बळी गेलेला असताना. १ हजार लोकांवर उपचार सुरू असताना एक सदस्यीय समिती नेमली हे देवेंद्र फडणवीस कोणत्या तोंडाने बोलत आहेत? महाराष्ट्राची जनता दुधखुळी आहे का? की तुम्ही काहीही सांगाल आणि आम्ही विश्वास ठेवू असं म्हणत सुषमा अंधारे यांनी सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही काय समजता असाही प्रश्न सुषमा अंधारेंनी विचारला आहे. काही वेळापूर्वीच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी हा आरोप केला आहे.
मात्र सुषमा अंधारे यांनी या सगळ्या कार्यक्रमात १०० पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला आहे. सरकारने या प्रकरणात एक सदस्यीय समिती नेमली आहे. ही एक सदस्यीय समिती नेमली हे कोणत्या तोंडाने सांगता असा प्रश्न आता सुषमा अंधारेंनी विचारला आहे.