काही दिवसापासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोंडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार सत्ताधारी पक्षात सामील होणार असल्याचंही बोललं जात आहे.
राज्याच्या राजकारणात लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातही धुसफूस सुरु असल्याच्या चर्चा आहे.महाविकास आघाडीच्या या दोन नेत्यांमध्ये होत असलेल्या वादांवरून हा संशय आणखी बळावला आहे. राष्ट्रवादीच्या फुटीच्या बातम्या समोर येत असल्यामुळे पुन्हा एकदा अजित पवारांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
AJIT PAWAR अचानकपणे कार्यक्रमांमधून निघून जाणे, दौरा रद्द करणं अशा बातम्यांमुळे अजितदादा नाराज आहेत का, अशी चर्चा सुरु आहे. यात आणखी भर पडली आहे.उद्या (ता.21) मुंबईत राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे विभागीय कार्यकर्ता शिबीर घाटकोपरमध्ये आयोजित करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमाच्या प्रसिद्धी पत्रकात खासदार प्रफुल्ल पटेल, माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यासह इतरही नेत्यांची नावं आहेत. परंतु यात अजित पवारांचे नाव मात्र वगळण्यात आले आहे. अजित पवार यांचे नाव का वगळण्यात आले, याचे कारण गुलदस्त्यातच आहे.
घाटकोपरच्या शिबिराला सुमारे दोन ते तीन हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार असून शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत. शिबिराला MP PRAFUL PATEL खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनिल तटकरे यांच्यासह माजी मंत्री छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड, अदिती तटकरे, अनिल देशमुख उपस्थित राहणार आहेत.तीन दिवसापूर्वी पुरंदर येथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते. अजित पवार हेही या कार्यक्रमास उपस्थित राहणार होते.या दौऱ्याचे फलक ठिकठिकाणी लावण्यात आले आहे. तसेच वडकी येथील एका कार्यक्रमास ते उपस्थित राहणार होते. पण त्यांनी आपला दौरा अचानक रद्द केल्याने ते कुठे गेले यांच्या चर्चा रंगल्या होत्या.काही पुर्वनियोजित कार्यक्रम असल्याने अजित पवार घाटकोपरच्या शिबिराला उपस्थित राहणार नसल्याने, त्यांचं या शिबिराच्या प्रसिद्धी पत्रकातून नाव वगळण्यात आल्याचं NCP नेत्यांकडून सांगण्यात आलं आहे.