आगामी काळात होणाऱ्या लोकसभा, विधानसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपसह सर्वच प्रमुख राजकीय पक्षात इन्कमिंग आणि आऊटगोईंग जोरदारपणे सुरु आहे. यातच शिंदे फडणवीसांची नजर महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांवर नजर असतानाच आता महाविकास आघाडीतही अंतर्गत इन्कमिंगही जोर धरु लागली आहे. महाडच्या माजी नगराध्यक्षा काँग्रेसचं युवा व तडफदार नेतृत्व म्हणून पाहिल्या जाणाऱ्या स्नेहल जगताप यांनी अखेर काँग्रेसला सोडचिठ्ठी देत ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याचं निश्चित मानला जात आहे. त्यामुळे काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
CONGRESS चे दिवंगत माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या स्नेहल जगताप यांच्याकडे महाड मतदारसंघातील काँग्रेसचा चेहरा म्हणून पाहिले जात होते. आता त्यांचा शिवसेना ठाकरे गटातील प्रवेश निश्चित झाल्याने महाड विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
महाड विधानसभा मतदारसंघ सध्या SHIVSENA च्या ताब्यात आहे. त्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली गेली तरी महाडची जागा ही उद्धव ठाकरे गटाला जाऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन जगताप यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.
काही दिवसांपूर्वीच माथेरान काँग्रेसचे शहर अध्यक्ष आणि माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नुकताच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. आता महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यादेखील पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. येत्या ६ मे रोजी त्या शिवसेना UDHAV THAKARE गटात प्रवेश करणार आहेत.
बालेकिल्ल्यातच शेकाप आणि काँग्रेसला घरघर..
रायगड जिल्ह्यात एकेकाळी शेकाप आणि काँग्रेस हे प्रमुख राजकीय पक्ष म्हणून ओळखले जात होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये याच दोन पक्षांत थेट लढत व्हायची. मात्र गेल्या काही वर्षांत दोन्ही पक्षांचा जनाधार घटल्याचे दिसून येत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत तर काँग्रेस आणि शेकापचा एकही उमेदवार जिल्ह्यातून निवडून येऊ शकलेला नाही. जिल्ह्यातील काँग्रेसची परिस्थिती तर मात्र खूपच बिकट झाली आहे.