तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची २४ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगरात जाहीर सभा होत आहे. (BRS) या सभेची जय्यत तयारी तेलंगणातून आलेली टीम करत असून शेतकरी व सर्वसामान्यांसाठी त्यांचे सरकार राबवत असलेल्या योजना आणि कामांची माहिती जिल्ह्यात पोहचवत आहे. यासाठी खास प्रचार रथ तयार करण्यात आला असून जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघातून तो फिरवला जाणार आहे.
या शिवाय भिंतीवरील पोस्टर, वाहनांवर पत्रके लावून KCR सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहचवण्याचा बीआरएसचा प्रवेश आहे. MARATHWADA सभा छत्रपती संभाजीनगरात होत असली तरी याचे संपुर्ण नियोजन हे केसीआर यांचे विश्वास खासदार, महाराष्ट्राचे निरीक्षक व त्यांची टीम करत आहे. त्यांना स्थानिक नेत्यांचे सहकार्य लाभत आहे.
एकंदरित NANDED , लोहा येथील सभेनंतर मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरातील सभा ही दणक्यात करण्याचा बीआरएसचा प्रयत्न दिसतो. आतापर्यंत मराठवाड्यातील ज्या माजी आमदार, पदाधिकारी, नेत्यांचा हैदराबादेत प्रवेश झाला, त्या सर्वांचा २४ रोजीच्या सभेत मेगा प्रवेश सोहळा होणार आहे.
तत्पुर्वी शहर आणि जिल्ह्यात बीआरएसची वातावरण निर्मिती करण्यासाठी या पक्षाचे तेलंगणातील नेते शहरात ठाण मांडून आहेत. तेलंगणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून राबविल्या जाणाऱ्या विकास आणि कल्याणकारी योजनांची माहिती गावागावात पोहोचवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदारसंघात प्रचार वाहने फिरवली जाणार आहेत.
बीआरएसचे निजामाबादचे आमदा आशांगरी जीवन रेड्डी यांच्या हस्ते या प्रचार रथांचा शुभारंभ आज करण्यात आला आहे. तसेच तेलंगणा राज्यातील विकासाचे मॉडेल, कल्याणकारी योजनांची माहिती देणाऱ्या भित्ती पत्रकांचे अनावरण देखील यावेळी करण्यात आले.