• Mon. May 5th, 2025

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमीत्त विलास कारखान्याच्या वतीने शासकीय रूग्णालय येथील रूग्णांना आणि मातोश्री वृध्दाश्रम येथे भोजनाची व्यवस्था उपक्रमाचे आयोजन

Byjantaadmin

Apr 19, 2023

माजी मंत्री, सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमीत्त विलास कारखान्याच्या वतीने शासकीय रूग्णालय येथील रूग्णांना आणि मातोश्री
वृध्दाश्रम येथे भोजनाची व्यवस्था उपक्रमाचे आयोजन

लातूर प्रतिनिधी :  : माजी मंत्री, सहकार महर्षी आदरणीय दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त विलास सहकारी साखर कारखाना लि. वैशालीनगर, निवळीच्या
वतीने मंगळवार दि. १८ एप्रिल २०२३ रोजी विलासराव देशमुख शासकीय वैदयकीय रूग्णालय येथे रूग्णांना व मातोश्री वृध्दाश्रम येथे ज्येष्ठ नागरीकांना भोजनाची व्यवस्था उपक्रमाचे आयोजन करून वाढदिवस साजरा करण्यात आला आहे. सहकार महर्षी, माजी मंत्री  दिलीपरावजी देशमुख एक बहूआयामी नेतृत्व आहे. मराठवाडयातील बाभळगाव येथील शेतकरी कुंटूबात ग्रामीण भागात त्यांचा जन्म झाला. गावच्या सरपंच पदापासून राज्याचे मंत्री म्हणून काम करतांना सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी उभारलेल विविध क्षेत्रातील काम पाहता अस दिूसून येते की, लातूर जिल्हयात एक नवीन काम उभा करणे गरजेचे आहे. या जाणीवेने त्यांच्या कार्याची सुरूवात झाली. अगोदर येथील सामाजिक वातावरण आणि विकासासाठी काय करणे गरजेचे आहे, याचा विचार करून त्यांनी पाऊले टाकली. एकाएका पदावरून पायरी-पायरीने पुढे जात असतांना विकासाची त्यांनी
नियोजनबद्ध आखणी केली. यामूळे पक्ष संघटना, सहकार, साखर उद्योग, स्थानिक स्वराज्य संस्था, जलव्यवस्थापन, दुष्काळ, सिंचन क्षेत्र, शिक्षण, क्रीडा, पर्यावरण यासर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी आपल्या कामाची उभारणी केली. लातूर जिल्हयातील सहकार व साखर उदयोगातील संस्थाचे त्यांनी उत्कृष्ट नियोजन केले आहे. त्याचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करून विलास कारखाना स्थळी साजरा करण्यात आला. माजी मंत्री, सहकार महर्षी  दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख व चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. मंगळवार दि. १८ एप्रिल २०२३ रोजी विलासराव देशमुख शासकीय वैदयकीय रूग्णालय येथे रूग्णांना एकवेळचे भोजनाची व्यवस्था करण्यात आली. सेच मातोश्री वृध्दाश्रम लातूर येथे एकवेळचे भोजन देण्यात येणार आहे. यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन रविंद्र काळे, कार्यकारी संचालक सजीव साई, संचालक सर्वश्री गोविंद बोराडे, अनंत बारबोले, अमृत जाधव, बाळासाहेब बिडवे, गोविंद डूरे, नारायण पाटील, संजय पाटील खंडापूरकर, सुभाष माने, सूर्यकांत सुडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *