सहकार महर्षी, वृक्षप्रेमी दिलीपराव देशमुख यांचा वाढदिवस ग्रीन लातूर वृक्ष टीम तर्फे विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला
latur सहकार महर्षी, दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या अविरत कार्याचा १४१७ वा दिवस आणि वाढदिवसा निमित्त राणी अहिल्याबाई होळकर चौक ते साई रोडवर ५१ वृक्षाचे रोपण करण्यात आले सर्व झाडांना भरपूर पाणी देत स्थानिक नागरिकांना हे झाड सांभाळण्याची संपूर्ण जबाबदारी आपली असल्याची जाणीव करून देण्यात आली व स्थानिकांनी आनंदाने ती स्वीकारली. ते आमचे कर्तव्य आहे असे सांगून साहेबांवर असलेले प्रेम त्यांनी वृक्षारोपण कार्यात सहभाग नोंदवून प्रकट केले.
ग्रीन लातूर वृक्ष टीम तर्फे आज पासून एक वेगळा उपक्रम सुरू केला आहे, वाढदिवस किंवा इतर कोणते शुभ कार्य असो त्या दिवशी झाडांच्या, फळांच्या,फळ व पालेभाज्यांचे बियांची पॉकेट वितरित करण्यात येत आहेत. आज दिलीपरावजी देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त११००(२२kg)फळ व पालेभाज्या बियांचे पॅकेट शहरातील मेन रोड व घरोघरी
वितरित करण्यात आले. या नावीन्यपूर्ण उपक्रमास उदंड प्रतिसाद मिळाला,प्रत्येक नागरिक या उपक्रमात कौतुकाची थाप देत माननीय साहेबांनावाढदिवसाच्या शुभेच्छा देत होते. हा उपक्रम करण्यामागचा उद्देश आजकालचीबाल व तरुण पिढी बागकाम, शेती, गच्चीवरील बाग, पारस बाग या संकल्पनेपासून फार दूर जाताना दिसत आहे. या बिया ज्या नागरिकांना वितरित करण्यात आल्या त्यांना आपल्या घरातील लहान व थोर व्यक्ती समक्ष उपलब्ध जागेवर किंवा मोठ्या कुंडीमध्ये या बिया लावून रसायन विरहित ताज्या भाज्यांची चव आणि बाजारातील भाज्यांची चव यातील फरक अनुभवता येईल, बीयांची पेरणी केल्यापासून फळ येईपर्यंत लगणारा कालावधी आणि केलेले कष्ट याची जाणीव प्रत्येकाला होणे आवश्यक आहे, त्यामुळे अन्नाची नासाडी किंवा अन्न वाया जाणार नाही आणि यातूनच या कामाची सर्वांना आवड निर्माण करणे हा प्रमुख उद्देश डोळ्यासमोर ठेऊन हा उपक्रम आखण्यात आला होता हे समजावून सांगण्यात आले. ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या प्रत्येक सदस्याची वृक्षारोपण आणि बियांचे पॅकेट वितरित करतेवेळी तळमळ पाहता अनेक नागरिकांनी श्री दिलीपरावजी देशमुख यांच्या नावाला शोभेल असा उपक्रम आपण राबवत आहात असे मत व्यक्त केले. कारण डी डी साहेब म्हणजे प्रेरणास्त्रोत आणि आपल्या
टीमची प्रत्येक नागरिकांनी ही प्रेरणा घेण्यासारखा हा उपक्रम, नक्कीच यापेक्षा चांगला अनुकरणीय, लोक उपयोगी, आरोग्यमय उपक्रम आजच्या दिवशी इतर कुठेही झाला नसेल या नागरिकांच्या भावना ऐकून ग्रीन लातूर वृक्ष टीमचे सर्व सदस्य आनंदित झाले. सदर उपक्रमात ग्रीन लातूर वृक्ष टीमचे डॉ. बोरगावकर सर, पद्माकर बागल सर , ऍड. वैशाली लोंढे यादव, दिपाली राजपूत,मनीषा कोकणे, तुळसा राठोड, बाळासाहेब बावणे, राहुल माने, दयाराम सुडे, अरविंद फड, दीपक नावाडे, अभिषेक घाडगे, आकाश सावंत, विजय मोहिते, गणेश सुरवसे, बालाजी उमरदंड, बळीराम दगडे, पांडुरंग बोडके, अमोल बिराजदार, आकाश चिल्लरगे, चिन्मय पन्हाळे यांनी सहभाग नोंदवला. ग्रीन लातूर वृक्ष टीमचे ज्येष्ठ सदस्य श्री बोरगावकर सर, श्री बागल सर यांनी ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या वतीन मा. श्री. दिलीपराव देशमुख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व ॲड. वैशाली लोंढे यादव मॅडम यांनी आदरणीय साहेबांना निरोगी दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा देत टीम मधील प्रत्येक सदस्यांनी उपक्रम यशस्वी करणे करिता केलेले परिश्रमा बद्दल सर्व सदस्यांचे आभार मानले.