लातूर शहर व जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने “जवाब दो मोदी, जवाब दो” आंदोलन
लातूर प्रतिनिधी –पुलवामा घटना आणि ३०० कोटीचा माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलेल्या गंभीर आरोपांवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर द्यावे या मागणीकरिता भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस कडून सर्वत्र सोमवार दिनांक १७ एप्रिल रोजी “जवाब दो मोदी” आंदोलन करण्यात आले. लातूर शहर व जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतिनेदेखील लातूरच्या नवीन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “जवाब दो मोदी” आंदोलन पार पडले. या वेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या गंभीर आरोपाविषयीची वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी अशी मागणी करीत लातूर शहर व जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते, सदस्यांनी निषेधाच्या घोषणा
दिल्या. भाजपचे वरिष्ठ नेते, जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटना व ३०० कोटीच्या ऑफरचा केलेला आरोप अत्यंत गंभीर असून माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलेले आरोप, भ्रष्टाचार व देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक आहेत. पुलवामा घटनेमध्ये ४० वीर जवान शहीद झाले आणि त्यात केंद्र सरकारची चुक झालेली चूक हे निदर्शनास आणून दिले तरी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना गप्प राहण्यास सांगीतले, असा थेट आरोप माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केला असताना त्यांच्या आरोपांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अद्यापही उत्तर दिलेले नाही.
माजी राज्यपाल मलिक यांनी केलेल्या आरोपांमुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात संशय व संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे सूचनेनुसार व माजी मंत्री, सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख , माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल उटगे व लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अँड.किरण जाधव यांचे नेतृत्वात “जवाब दो मोदी, जवाब दो” हे आंदोलन लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी
करण्यात आले. या आंदोलनाच्या माध्यमातून (१) पुलवामा घटनेत केंद्र सरकारची अक्षम्य चूक झाली आहे, या वक्तव्यावर मलिक यांना गप्प राहण्यास का सांगीतले गेले ? (२) भारतीय जवांनाना दुसरीकडे पाठविण्यासाठी विमानाची मागणी केली असता, ती का नाकारण्यात आली ? (३) पुलवामा घटनेत वापरले गेलेले ३०० किलो आर.डी.एक्स.कुठून आले ? (४) पुलवामा घटना व ४० जवानांचे बलिदान, हे भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी केले होते का ? (५) माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघटन महासचिव राम माधव यांनी ३०० कोटी रुपयांची ऑफर का दिली ? (६) अदानी समूहाच्या घोटाळ्याबद्दल मा. राहुलजी गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे मोदींनी उत्तर द्यावे. (७) शेतकऱ्यांचे आयुष्य बर्बाद करणाऱ्या तीन काळ्या कायद्यांबद्दल आणि हे काळे कायदे वापस घेण्यासाठी आंदोलन करतांना शहीद झालेल्या ७५० पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या मृत्युला जबाबदार कोण? (८) पीक विम्याच्या नावाखाली अदानी-अंबानी साठी अन्नदात्याचा बळी घेणारे व जनतेची तिजोरी लुटून देणारे कोण ? या सर्व प्रश्नांवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर द्यावे आणि वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी अशा मागण्या करीत या आंदोलनात निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी सौ.स्मिताताई खानापुरे, सुभाष घोडके, गोरोबा लोखंडे, अँड.बाबासाहेब गायकवाड, पृथ्वीराज सिरसाट, राजकुमार जाधव, चंद्रकांत धायगुडे, अँड.देविदास बोरूळे पाटील, एकनाथ पाटील, सुरेश चव्हाण, रमेश सूर्यवंशी, बालाजी सोळुंके, प्रा.प्रवीण कांबळे, जालिंदर बरडे, शरद देशमुख, सौ.स्वातीताई जाधव, केशरताई महापुरे, महेश काळे, आसिफ बागवान,मोहन माने, राजकुमार माने, मुकेश राजमाने, ओमप्रकाश झुरुळे, ज्ञानोबा गवळे, अँड.अजित काळदाते, कांचनकुमार चाटे, नागसेन कामेगावकर, महादेव बरुरे, डॉ. हमीद बागवान, धनंजय शेळके, संजय ओहळ, बाप्पा मार्डीकर, सुरेश गायकवाड, सुलेखाताई कारेपुरकर, शिला वाघमारे, अनिता रसाळ, पुजा चिकटे, कमलताई शहापुरे, लक्ष्मीताई बटनपूरकर, कमलताई मिटकरी, मेघराज पाटील, अभिषेक पतंगे, अभिजित इगे, पवन सोलंकर, अविनाश देशमुख, विजय चव्हाण, पवनकुमार गायकवाड, गोविंद कदम, राजेश कासार, समाधान गायकवाड, अमोल भिसे, महेश चव्हाण, लिंबराज पाटील, बालाजी मनदुमले, गोविंद केंद्रे, विकास कांबळे, श्रीकांत गर्जे, दयानंद कांबळे, अशोक सूर्यवंशी, नागनाथ कांबळे, बिभीषण सांगवीकर, संजय सुरवसे, करीम तांबोळी, पिराजी साठे, अँड.अंगदराव गायकवाड आदी मान्यवर उपस्तिथ होते.