निलंगा:-मराठा सेवा संघ शाखा निलंगा व देशमुख पेट्रोलियम,निलंगा यांच्या वतीने निलंगा शहरातील मुस्लीम बांधवांसाठी देशमुख पेट्रोल पंप निलंगा येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते
मराठा बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून बंधुभाव जपणारा समाज म्हणजे मुस्लिम समाज आहे,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून आजपर्यंत मुस्लिम बांधवांनी मराठ्यांना साथ दिली आहे,तसेच सामाजिक सलोखा राखला आहे व तो कायमस्वरूपी तसाच रहावा यासाठी हे नियोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी मा.मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर साहेब,देशमुख पेट्रोलियमचे संचालक लालासाहेब देशमुख, पोलीस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ, पोलीस उपनिरीक्षक प्रताप गर्जे,मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव जाधव एम एम,माजी नगराध्यक्ष हमीद शेख, माजी उपनगराध्यक्ष मनोज कोळे,मा. बांधकाम सभापती इरफान सय्यद,नसीम खतीब,मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष डॉ. शेषराव शिंदे,दत्ताभाऊ शाहीर, संजय इंगळे, विशाल जोडदापके, विनोद सोनवणे, डी. बी. बरमदे, अजय मोरे,डी. एन बरमदे, प्रकाश सगरे,आर के नेलवाडे, नसीम खतीब, फारुख शेख, सय्यद बागवान, अमीर सय्यद,गुणवंतराव गायकवाड,शेषराव ममाळे,सुमित इनानी,अजित जाधव,दत्तात्रय बाबळसुरे,अमरदिप पाटील,प्रताप हंगरगे,प्रमोद कदम, अजित लोभे व मुस्लिम बांधव उपस्थित होते.