भालकी:-कर्नाटक राज्यातील भालकी मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार ईश्वरजी खंड्रे यानी सोमवारी दि17 रोजी त्यांचा उमेदवारी अर्ज काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत दाखल केला.
यावेळी आखील भारतीय काँंग्रेस कमिटीचे प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला, राष्ट्रीय कर्नाटक प्रदेश काँंग्रेस कमिटी प्रदेशाअध्यक्ष डी.के. शिवकुमार, महाराष्ट्र प्रदेश काँंग्रेस कमिटीचे माजी मंत्री तथा कार्याध्यक्ष . बस्वराज पाटील मुरुमकर , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव तथा कर्नाटक विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२३ चे स्टार प्रचारक अभय दादा साळुंके, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा कर्नाटक विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२३ चे स्टार प्रचारक अशोकराव पाटील निलंगेकर, देवणी तालुका काँंग्रेस कमिटीचे माजी तालुकध्यक्ष तथा काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते . मल्लीकार्जुन मानकरी सावकार, यांच्यासह काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी . अभय साळुंके यांनी ईश्वर खंड्रे हे विक्रमी मताधिक्य मिळवून निवडणून येतील असा विश्वास जाहीर सभेत केला.