• Mon. May 5th, 2025

नागपूर : महाविकास आघाडीच्या सभेनंतर गोमूत्र शिंपडून भाजपाने केले मैदान शुद्ध!

Byjantaadmin

Apr 17, 2023

नागपूर : पूर्व नागपुरातील दर्शन कॉलनी मैदानात महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा झाल्यानंतर मैदान बचाव कृती समितीच्या नागरिकांनी व भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मैदानाची साफसफाई केली व मैदानात गोमूत्र शिंपडून मविआच्या नेत्यांचा निषेध केला.

Mahavikas Aghadi meeting Nagpur

सद्भभावना नगर दर्शन कॉलनी मैदान हे खेळाचे मैदान असून या मैदानात राजकीय सभा घेऊ नये म्हणून मैदान बचाव समितीने गेल्या सहा दिवसांपासून मैदानं सभेला देऊ नये यासाठी विरोध करत आंदोलन केले. मैदानाचा वाद न्यायलयात गेला. पण न्यायालयाने सभेला परवानगी दिली. रविवारी सभा झाल्यानंतर सभेच्या ठिकाणी परिसरातील नागरिक व भाजपाचे माजी नगरसेवक हरीश डिकोडवार आणि अन्य माजी नगरसेवकांनी मैदानात गोमूत्र शिंपडले व साफसफाई करत आघाडी सरकारचा निषेध केला. दरम्यान, सभेच्या दिवशी महाआरती करणार होते. मात्र, ही महाआरतीसुद्धा रद्द करण्यात आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *