• Fri. May 2nd, 2025

परतीच्या पावसाचा तडाखा:शेतपिकांचे मोठे नुकसान; कोकण, मराठवाडा, विदर्भात येलो अलर्टचा इशारा

Byjantaadmin

Oct 13, 2022

राज्याच्या अनेक भागांत परतीच्या पावसाने तडाखा दिला आहे. त्यामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यासोबतच भाजीपाला, फळबागांनाही मोठा फटका बसला आहे.

भारतातून मान्सून परतण्यास पोषक हवामान होत आहे. त्यामुळे आजदेखील आजदेखील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट)

  • कोकण : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
  • मध्य महाराष्ट्र : नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.
  • मराठवाडा : उस्मानाबाद, लातूर, नांदेड.
  • विदर्भ : बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर.
  • राज्यातील ऊस पट्ट्यातही मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे साखर कारखान्यांच्या 15 नोव्हेंबरला होणाऱ्या सुरू होणाऱ्या नियोजित गळीत हंगामाला ‘ब्रेक’ लागण्याची शक्यता आहे. पावसामुळे ऊस सऱ्यांमध्ये पाणी साचून आहे. परिणामी तोडणी पंधरा दिवस तरी लांबणीवर जाईल, अशी शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *