विरोधी पक्षांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून नेहमी चर्चेत राहणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या पुन्हा एकदा चर्चेत आलेत. मुंबई विद्यापीठाने त्यांना अवघ्या 14 महिन्यात पीएचडी प्रदान केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
विशेष म्हणजे याती काहीही चुकीचे नाही. मात्र, ज्या विद्युत गतीने नील सोमय्या यांना पीएचडी पदवी मिळाली, त्याबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. नेटकऱ्यांनीही टीकेचे बाण सोडले आहेत.

कुशामुळे चर्चा होतेय?
नील सोमय्या यांनी मुंबई विद्यापीठात पीएचडी पदवीसाठी जून 2021 मध्ये नोंदणी केली. त्यांनी ऑगस्ट महिन्यात पीएचडीसाठी शोध प्रबंध विद्यापीठाला सादर केला. त्यानंतर लगेच दीड महिन्यात त्यांची तोंडी परीक्षा झाली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी 1 ऑक्टोबर 2022 रोजी विद्यापीठाने नील सोमय्या यांना पीएचडी पदवी दिली
नील सोमय्या यांचे पीएचडीचे मार्गदर्शक एम. ए. खान होते. ते म्हणतात की, नील यांनी पीएचडी पदवी अभ्यासक्रमासाठी नोंदणी केल्याची बाब एकतर विद्यापीठाने नमूद केली नाही. त्यांनी मार्च 2020 मध्ये प्रबंध सबमिट केला. त्यात कोरोना लाट आली. त्यांना 2021 मध्ये काही सुधारणा सांगितल्या. त्यांनी त्या करून लगेच वर्षात प्रबंध सादर केला. त्यांनी सर्व प्रक्रियांचे पालन केले. फक्त विद्यापीठाने त्यांच्याबाबत खूपच तत्परता दाखवली.
‘आयएनएस विक्रांत’प्रकरणीही किरीट सोमय्यांसह नील सोमय्या यांचे नाव चर्चेत आले होते. ‘विक्रांत बचाव’ मोहिमेच्या नावाखाली 57 कोटी रुपयांचा फंड जमा करून घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांच्यावर झाला होता. एका माजी लष्करी व्यक्तीने केलेल्या तक्रारीनंतर 6 एप्रिल रोजी किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील सोमय्या यांच्याविरुद्ध मुंबईतील ट्रॉम्बे पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला होता. किरीट सोमय्यांनी आयएनएस विक्रांतसाठी मुंबईत निधी गोळा केला होता. हा निधी राजभवानाकडे सुपूर्द करणे गरजेचे होते. पण, सोमय्यांनी निधी राजभवनाला दिला नाही, असे म्हटले होते.