कोळी समाजाच्या जात पडताळणीसाठी लातूर जिल्ह्यात विशेष शिबीराचे आयोजन करणार
माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर
…….
निलंगा, : सध्या राज्यात शिंदे-फडणविस हे भाजपा युतीचे सरकार असून हे सरकार प्रत्येक समाजातील घटकाला न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘कोळी महादेव’ समाजाला जातीचे दाखले मिळतात मात्र त्याची जात पडताळणीसाठी अडचणी येतात त्या दूर करून सुलभ पध्दतीने जात पडताळणीसाठी लातूर जिल्ह्यात विशेष शिबीराचे आयोजन करणार असल्याची ग्वाही माजी मंञी संभाजीराव पाटील निलंगेकर यानी बुधवारी ता. १२ रोजी दिली.
चिचोंली भंगार ता. निलंगा येथे अद्य कवि महर्षी वाल्मिकी मुर्ती स्थापना कार्यक्रमात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर औसाचे आमदार अभिमन्यू पवार, महर्षो वाल्मिकी मुर्ती अर्पण करणारे शेतकरी नागनाथ मुडे व त्यांच्या पत्नी करूणा मुडे, सतिश धडे, चंद्रहास नलमले,सरपंच सुशलाबाई हत्ते,संजय बोयणे, शेषराव ममाळे, विरभर्द स्वामी, ज्ञानेश्वर वाकडे, बळी पाटी आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना निलंगेकर म्हणाले की, येणाऱ्या काळात कोळी समाजाच्या वैद्यतेची जबाबदारी माझी असून या समाजावर गेल्या अनेक वर्षापासून जात पडताळीसाठी अन्याय होत आहे. यासाठी आपण लवकरच आम्ही अदिवासी मंत्र्याची भेट घेऊन चर्चा करणार आहोत. लातूर जिल्ह्यातील कोळी समाजाच्या जात पडताळणीसाठी विशेष शिबीर घेऊन हा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंञी देवेंद्र फडणविस यांच्याकडे मी व आमदार अभिमन्यू पवार प्रयत्न करणार आहोत. जातीच्या प्रमाणपत्रासाठी जिल्ह्यात कोणत्याही अधिकाऱ्यांनी अडवणूक केल्यास त्याची गय केली जाणार नाही अशा सुचनाही निलंगेकर दिल्या. लातूर जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होईल यापेक्षा भाजपचा पालकमंत्री झाल्याचा आनंद आहे असे सांगून पूर्वी जिल्ह्याचे राजकीय केंद्र हे लातूर होते. आता राजकीय केंद्र निलंगा आहे. वाडप्या आपला असल्यामुळे विकास निधी कमी पडणार नाही अशी ग्वाही देऊन महाविकास आघाडीच्या काळात तत्कालीन पालकमंत्र्यांनी निधी वाटपात औसा व निलंगा मतदार संघावर अन्याय केला होता. असा आरोप त्यानी केला. यावेळी अभिमन्यू पवार म्हणाले की, निलंगेकर घराण्याचे वलय मोठे असून मी सामान्य कार्यकर्ता आहे. तुम्ही जे सुचना कराल ते मी मान्य करतो चिंचोली भंगार हे आमदार निलंगेकर यांचे गाव असल्यामुळे या गावासाठी कोणताही निधी कमी पडू देणार नाही. कोळी समाजाच्या मागण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंञी यांच्याकडे कायमचा मिटवण्यासाठी कोळी समाजाचे वकीलपत्र मी आणि आमदार निलंगेकर घेत आहोत अशी ग्वाही आमदार पवार यानी उपस्थित समाज बांधवासमोर दिली.शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी फळबाग लागवडीकडे वळावे असे आव्हान त्यानी यावेळी केले.
या कार्यक्रमाचे प्रास्तविक रमेश नलमले यानी केले तर आभार माधव मुडे यानी मानले. यावेळी परीसरातील कोळी समाजाचे महिला पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी हरिशचंद्र मुडे, भिवाजी ऐकेले, किशोर नलमले यासह आदीनी परिश्रम घेतले.