मदनसुरी तालुका निलंगा जिल्हा लातूर येथील अंगणवाड्या ला साहित्य वाटप
निलंगा:-मदनसुरी तालुका निलंगा येथे आज दिनांक 12 ऑक्टोबर 2022 रोजी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने साहेब यांच्या हस्ते सात अंगणवाड्याला त्यांच्या मागणीप्रमाणे साहित्याचे वाटप करण्यात आले साधारण एक महिन्यापूर्वी अंगणवाडी ताई सेविका यांचे शिष्ट मंडळ ग्रामपंचायत मध्ये आदरणीय शिवाजी भाऊ यांच्याकडे मागणी करण्यासाठी आलेला असताना शिष्टमंडळामधील अंगणवाडी ताई व सेविका यांनी आदरणीय शिवाजी भाऊ यांच्याकडे दोन खुर्च्या धान्य साठवण्यासाठी कोठी पाण्यासाठी प्लास्टिकची का होईना पण घागर काही साहित्य मागितले होते त्यावेळेस शिवाजी भाऊ माने यांनी सर्व अंगणवाडी ताई आणि सेविका यांना सांगितलं तुम्हाला दोन खुर्च्या किंवा तुम्ही मागणी केलेले साहित्य पुरेसं नाही तुमच्या अंगणवाडी ला भेट देण्यासाठी कोणी अधिकारी पालक जर आले तर त्यांना बसण्यासाठी दोन खुर्च्या कशा बस होतील आणि प्लास्टिकची घागर उपयोगी येणार नाही तुम्हाला दिले जाणार साहित्य अत्यंत चांगल्या दर्जाचा असेल त्यामध्ये घागर पितळच असेल दररोज विद्यार्थ्याला पिण्यासाठी पाणी साठवण्यासाठीचा पिंप असेल बसण्यासाठी लागणाऱ्या खुर्च्या असतील हे सगळं साहित्य चांगल्या दर्जाचे मी देईल असा शब्द दिला होता त्याप्रमाणे आज आदरणीय शिवाजी भाऊ यांच्या हस्ते पितळेची घागर तांब्याचा जग तांब्याचे सहा ग्लास सहा खुर्च्या पिण्याचे पाणी साठवण्यासाठी पिंप धान्य साठवण्यासाठी कोठ्या पाणी फिल्टर पातेले पळी चमचा तसेच गॅस शेगडी हे सर्व साहित्य अंगणवाडी सेविका यांच्याकडे आज सोपविण्यात आले यावेळी अंगणवाडी ताई म्हणाल्या की खरंच असं साहित्य आत्तापर्यंत कुठल्याही अंगणवाडीला मिळालं नसेल असं साहित्य आदरणीय शिवाजी भाऊ माने यांनी आम्हाला दिलेला आहे याबद्दल आम्ही सर्वजण आदरणीय भाऊचे ग्रामपंचायत सर्व सदस्यांचे व ग्रामसेवक यांचे आभार मानतो असे उद्गार अंगणवाडी ताई सूर्यवंशी ताई यांनी काढले याप्रसंगी गावातील ग्रामपंचायत चे सर्व सदस्य पोलीस पाटील सूर्यवंशी सर लाला शेख दिलीप जाधव माधव शिंदे आबा गायकवाड सामाजिक कार्यकर्ते आकाश शिंदे तात्या माने अंगणवाडी सेविकास सर्व अंगणवाडी ताई उपस्थित होत्या