जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांबाबत मोठा खुलासा केला आहे.केंद्रातील मोदी सरकारच्या निष्काळजीपणामुळेच पुलवामा हल्ला झाल्याचा आरोप सत्यपाल मलिक यांनी केला आहे. धक्कादायक म्हणजे खुद्द PM MODI आपल्याला या संपूर्ण प्रकरणात मौन बाळगण्याचा सल्ला होता, असंही मलिक यांनी म्हटलं आहे.
सत्यपाल मलिक यांनी द वायरला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला आहे.सीआरपीएफचा ताफा घेऊन जाण्यासाठी गृह मंत्रालयाकडे पाच विमानांची मागणी केली होती. परंतु गृह मंत्रालयाने सीआरपीएफला विमान देण्यास मान्यता दिली नाही. विमान दिले असते तर हा हल्ला झालाच नसता. हल्ल्याच्या संध्याकाळीच आपण पंतप्रधान मोदींना आपल्यामुळे जवानांचे प्राण गमावले, असे म्हटलं. पण यावर पंतप्रधानांनी आपल्याला शांत राहण्याचा सल्ला दिला. असही मलिक यांनी यावेळी सांगितल
सत्यपाल मलिक म्हणाले की, सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला झाला त्या दिवशी पंतप्रधान जिम कॉर्बेट पार्कमध्ये शूटिंग करत होते.पंतप्रधान मोदींना या हल्ल्याची माहिती मिळताच त्यांनी संपर्क साधला. आपण संपूर्ण हकीकत पंतप्रधानांना सांगितली. मात्र,पंतप्रधानांनी पुलवामात घडलेला हा प्रकार पुढे कोणालाही सांगण्यास नकार दिला.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Dowal) यांनाही घडलेला प्रकार सांगितला. पण डोवाल यांनीही त्यांना गप्प राहण्यास सांगितले.माझ्या अधिकारात असते तर मीच जवानांसाठी सीआरपीएफला विमाने उपलब्ध करून दिली, असंही मलिक यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, या सर्व खुलाशांवर ,पंतप्रधान मोदींनी गप्प राहण्याचा सल्ला दिला होता का?याचाच अर्थ पुलवामा हल्ल्याचा निवडणुकीत फायदा उठवण्याचा प्रयत्न झाला का, असा प्रश्न केला.त्यावर, सत्यपाल मलिक यांनी होकार देत सहमती दर्शवली. धक्कादायक म्हणजे या गोष्टी पुढे न कळल्यामुळे केंद्रसरकारचे अत्यंत दुर्लक्ष झाले. या घटनेचा सर्व दोष पाकिस्तानवर टाकून मोदी सरकार आपल्या जबाबदारीतून मुक्त झाले, असा आरोपही त्यांनी केला आहे.