आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारच्या विरोधात विरोधक मोट बांधत असताना एका मुख्यमंत्र्याने केंद्रात आपल्या पक्षाचे सरकार येणार असल्याचा दावा केला आहे. भारत राष्ट्र समिती (BRS)चे सर्वेसर्वा तेलगंणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी हा दावा केला आहे.
काल (शुक्रवारी) डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. तीन दिवसापूर्वी दिल्लीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी खासदार राहुल गांधी, बिहारचे माजी मुख्यमंत्री नीतीश कुमार ,राजदचे नेता तेजस्वी यादव आदी भाजप विरोधी नेत्यांनी विरोधी पक्षाना एकत्र येण्याचा संकल्प केला. यानंतर तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या विधानाने चर्चा रंगल्या आहे.
नीतीश कुमार यांनी आम आदमी पक्षाचे अध्यक्ष, दिल्लीचे मुख्यमंत्री arvind kejriwal भाकपाचे महासचिव डी राजा आणि माकपा नेता सीताराम येचुरी यांची भेट घेतली आहे. के. चंद्रशेखर यांची भेट घेण्याची जबाबदारी तेजस्वी यादव यांच्यावर सोपविण्यात आली आहे. अशातच केसीआर यांचे हे विधान आले असल्याचे विरोधक पक्षांच्या नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मोदीचे विरोधक एकत्र येत असताना केसीआर यांनी थेट आव्हान दिल्याची चर्चा यानिमित्ताने सुरु झाली आहे. सत्तेत येण्यासाठी केंद्रात किती जागा मिळतील, याबाबत त्यांनी स्पष्टपणे सांगितले नाही. पण आमचा पक्ष सत्तेत आला तर देशात ‘दलित बंधु योजना’राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
देशात एकीकडे ऐन उन्हाळ्यात राजकीय वातावरण तापले असताना दुसरीकडेbrs गेल्या काही दिवसांपासून धुमाकूळ घातला आहे. अशातच वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची शुक्रवारी भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
के चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षाकडून महाराष्ट्रात पुढील निवडणुका समोर ठेवून या राजकीय घडामोडी सुरू आहे. ते पाहता प्रकाश आंबेडकर आणि के चंद्रशेखर राव यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.